पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धुळवड खेळल्यानंतर दुपारच्या सुमारास रंग काढायला नदीवर गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून मृत्यू

इमेज
धुळवड खेळल्यानंतर दुपारच्या सुमारास रंग काढायला नदीवर गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून मृत्यू ठाणे : देशभरासह राज्यात धुळवड उत्साहात साजरी केली जात आहे. अनेकजण रंगात न्हावून निघालेत. सर्वत्र रंगांची उधळण केली जात आहे. हा रंग जसा आयुष्यात नवचैतन्य घेवून येतो, तसाच तो आयुष्याचा बेरंगही करतो. अशीच एक घटना बदलापूर येथे शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेनं मुलांच्या आयुष्याचा बेरंग झालाच पण त्या चार कुटुंबांच्या आयुष्यातला रंगही उडाला, असं म्हणावं लागेल. नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू : धुळवड खेळल्यानंतर दुपारच्या सुमारास रंग काढायला नदीवर गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. हे चौघे बदलापूर शहरातील चामटोली जवळील पोद्दार गृह संकुलातील राहणारे होते. विशेष म्हणजे, हे चारही मुलं दहावीचे विद्यार्थी असून, ते राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.  चौघांचे मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीनं पाण्याबाहेर काढण्यात आले असून, त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात रवाना करून पोलिसांनी तपास सुरू केला...

महाबोधी विहार मुक्त करा परिवर्तन एकलोक चळवळीचे राष्ट्र्पतीना निवेदन

इमेज
महाबोधी विहार मुक्त करा परिवर्तन एकलोक चळवळीचे राष्ट्र्पतीना निवेदन  परिवर्तन एकलोक चळवळीच्या माध्यमातून 12 मार्च,2025 रोजी उल्हासनगर तहसीलदार यांचे मार्फत राष्ट्र्पती यांना उल्हासनगर प्रभारी आबासाहेब साठे, दिपक सोनोने, शैलेंद्र रूपेकर, बाबू आढाव, केशव लोणारे, गणेश मोरे गुरुजी, संतोष पडघान, सुभाष सरकटे, यांनी निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की   महाबोधी विहार ( बुद्धगया ) ब्राह्मण मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे  आदी विषयी संपूर्ण भारतभर आंदोलने होत असुन  सदर विषयी बौद्ध समाजाच्या भावना लक्षात घेऊन बौद्ध विहार मुक्त करण्यात यावे अशी मागणी निवेदन पत्रात करण्यात आली आहे अशी माहिती आबासाहेब साठे यांनी दिली

परिवहन विभागातील गैरकाराभाराची अधिकाऱ्यांकडूनच तक्रार,परिवहन आयुक्त, अपर परिवहन आयुक्तांविरोधात तक्रार

इमेज
परिवहन विभागातील गैरकाराभाराची अधिकाऱ्यांकडूनच तक्रार,परिवहन आयुक्त, अपर परिवहन आयुक्तांविरोधात तक्रार परिवहन मंत्र्यांना उद्देशून २० फेब्रुवारी रोजी खडसे यांनी पत्र लिहले आहे. त्यात परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यावर निविदा प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.                                     मुंबई : परिवहन विभागाच्या वायुवेग पथकांसाठी ६९ नवीन इंटरसेप्टर वाहनांवर कॅमेरायुक्त रडार यंत्रणेच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारे साताऱ्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांनी लिहिलेले तक्रार पत्र प्रसारित झाले आहे.     परिवहन मंत्र्यांना उद्देशून २० फेब्रुवारी रोजी खडसे यांनी पत्र लिहले आहे. त्यात परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्यावर निविदा प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  खडसे यांच्या पत्रात असा दावा करण्यात आला आहे की, भीमनवार...

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन

इमेज
उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन  6 तासांत रुग्णवाहिका आली नाही रुग्णाने सोडले प्राण जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी नोटीस बजावली होती. याबाबत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले.       रुग्णवाहिकेसाठी 108 क्रमांकावर फोन केला जातो. त्यानंतर काही वेळेतच रुग्णवाहिका येत असल्याचा दावा केला जातो. परंतु उल्हासनगरमध्ये वेगळाच प्रकार घडला. अत्यवस्थ असलेल्या रुग्णास नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिकेला फोन केला. परंतु एक तास झाला, दोन तास झाले तरी रुग्णवाहिका आली नाही. फोन केल्यावर सहा तास झाल्यावरही रुग्णवाहिका आली नाही. अखेर चिंताजनक प्रकृती असलेल्या त्या रुग्णाने प्राण सोडला. या प्रकरणात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन करण्यात आले.                          ...

लाचेप्रकरणी भूमी अभिलेख उप अधीक्षक ताब्यात तक्रारदाराला जमीन मोजणी करुन देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे.

इमेज
लाचेप्रकरणी भूमी अभिलेख उप अधीक्षक ताब्यात तक्रारदाराला जमीन मोजणी करुन देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.                                              ठाणे : येथील भूमि अभिलेख उप अधीक्षक चांगदेव मोहळकर आणि भूकरमापक श्रीकांत रावते यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. तक्रारदाराला जमीन मोजणी करुन देण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.                     भूमि अभिलेख विभागात चांगदेव मोहळकर हे उप अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांच्या जमीनीची मोजणी करायची होती. यासाठी ते ठाण्यातील भूमी अभिलेख कार्यालयात गेले होते. २७ फेब्रुवारीला तेथील अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून लाचेची मागणी केली होती. त्यानंत...