धुळवड खेळल्यानंतर दुपारच्या सुमारास रंग काढायला नदीवर गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून मृत्यू

धुळवड खेळल्यानंतर दुपारच्या सुमारास रंग काढायला नदीवर गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून मृत्यू
ठाणे : देशभरासह राज्यात धुळवड उत्साहात साजरी केली जात आहे. अनेकजण रंगात न्हावून निघालेत. सर्वत्र रंगांची उधळण केली जात आहे. हा रंग जसा आयुष्यात नवचैतन्य घेवून येतो, तसाच तो आयुष्याचा बेरंगही करतो. अशीच एक घटना बदलापूर येथे शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेनं मुलांच्या आयुष्याचा बेरंग झालाच पण त्या चार कुटुंबांच्या आयुष्यातला रंगही उडाला, असं म्हणावं लागेल.

नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू : धुळवड खेळल्यानंतर दुपारच्या सुमारास रंग काढायला नदीवर गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. हे चौघे बदलापूर शहरातील चामटोली जवळील पोद्दार गृह संकुलातील राहणारे होते. विशेष म्हणजे, हे चारही मुलं दहावीचे विद्यार्थी असून, ते राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.

 चौघांचे मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीनं पाण्याबाहेर काढण्यात आले असून, त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात रवाना करून पोलिसांनी तपास सुरू केलाय. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत