मुंबई येथे बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ...*



*मुंबई येथे बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ...* 
मुंबई (प्रतिनिधी)  -  गणेश तळेकर  राज्यातील बालकलावंतांसह दिव्यांग बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ रविवारी ( दि.५ - १० -  २०२५ ) रोजी श्री सत्यनारायण महापुजेने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात झालेल्या या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. महापुजेनंतर अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्यासह मध्यवर्ती कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष राजू तुलालवार, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह आसेफ शेख अन्सारी, दिपाली शेळके, कार्यकारिणी सदस्य अनंत जोशी, नागसेन पेंढारकर, वैदेही चवरे सोईतकर, निमंत्रित कार्यकारिणी सदस्य शिवाजी शिंदे, सुजय भालेराव, सीमा यलगुलवार, नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष शुभम चौगुले यांच्यासह बृहन्मुंबई शाखा उपाध्यक्ष  सुनील सागवेकर, कार्याधक्ष्य ज्योती निसळ, प्रमुख कार्यवाहक आसेफ शेख, कोषध्यक्ष यशोदा माळकर पदाधिकारी, सदस्य व नवी मुंबई शाखा उपाध्यक्ष बाळकृष्ण ओडेकर आणि प्रमुख कार्यवाह निखिल आवटे,  पदाधिकारी व सदस्यांनी कार्यालयात प्रवेश करत, कार्यालयाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी नृत्य, नाट्य, संगीत क्षेत्रातील मान्यवरांसह, रंगमंच बॅकस्टेज वर्कर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी, द ग्लोबल टाइम्स, कार्यकारी संपादक, माईमीडिया संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर, ऑल द बेस्ट नाटकाचे लेखक दिग्दर्शक देवेंद्र पेम, नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे, दिग्दर्शक - अभिनेते प्रवीण अहिरे, आर्यन देसाई , फोटोग्राफर समीर देसाई  यांनी  बालरंगभूमी परिषदेच्या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यालयात भेट दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

महाराष्ट्रातील तमाम बहुजन जनतेला आम्ही ,जाहीर आवाहन करतो की, जनहित लोकशाही पक्षाने ,2024 च्या,विधानसभेला महाराष्ट्रा तील अनेक मतदार संघांमध्ये उमेदवार उभे केलेले आहेत.