*उल्हासनगर महापालिका निवडणूक २०२६: प्रभाग क्र. १७ मधून हरी चंदर आल्हाट निश्चितपणे अपक्ष लढणार!*

*उल्हासनगर महापालिका निवडणूक २०२६: प्रभाग क्र. १७ मधून हरी चंदर आल्हाट निश्चितपणे अपक्ष लढणार!* 

 *उल्हासनगर:आबासाहेब साठे* 

उल्हासनगर महानगरपालिकेच्या
२०२६ च्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १७ मधून एक महत्त्वाची घोषणा झाली आहे. स्थानिक जनसेवक श्री. हरी चंदर आल्हाट यांनी आगामी महापालिका निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवण्याचा आपला निर्णय निश्चित केला आहे.
श्री. आल्हाट यांनी घेतलेला हा ठाम निर्णय प्रभाग क्र. १७ मध्ये मोठी राजकीय चुरस निर्माण करणारा ठरणार आहे.

 *नागरिकांसाठी लढणार!* 

प्रभागातील नागरिक आणि समस्यांवर प्रकाश टाकताना श्री. हरी चंदर आल्हाट म्हणाले की प्रभागतील अनेक विकास कामे रखडली आहेत त्यांना पूर्ण करण्याची गरज आहे 

१ ) पिण्याचे पाण्याची समस्याचे निवारण 

२ )  ओला व सुका कचरा वेग वेगळा टाकण्यासाठी प्रभागात ठीक ठिकाणी व्यवस्था करणे 

३ )  कचरा उचलण्यासाठी प्रत्येक वस्ती मध्ये वेळेवर घंटा गाडीची वेळ निश्चित करणे 

४ ) सांडपाणी सुरूळीत वाहून जाण्यासाठी नाली व गटारे व्यवस्थित करणे व नाली वर ढाकणे बसविणे

५ ) प्रभागातील रोड व रस्ते सिमेंट काँक्रेटचे करणे 

६ ) प्रत्येक वस्ती मध्ये अग्निशामक दलाच्या गाड्या व ॲम्ब्युलन्स येण्या जाण्यासाठी पर्याप्त रस्ता रुंदीकरण करणे

७ ) वस्ती मधील विजेचे खांब हटवून जमिनी मधून केबल वायर ने वीज पुरवठा सुरक्षित करणे 

८ ) प्रत्येक वस्ती मध्ये पर्याप्त जागे नुसार समाज मंदिर बनविणे ज्या मध्ये लग्न सोहळा व ईतर कार्यक्रम होतील अशी व्यवस्था करणे 

९ ) प्रभागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची  व्यवस्था करणे 

१० ) लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना गार्डन ची व्यवस्था करणे 

११ ) प्रत्येक वस्ती मध्ये पर्याप्त जागे नुसार  वाचनालय व ज्येष्ठ नागरिकांना बसण्याचे आसनची व्यवस्था करणे 

१२ ) वस्ती मध्ये चोऱ्या व कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक होऊ नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे 

१३ ) प्रभागातील नागरिकांना घरपट्टी किंवा विज बिल भरण्याची सुविधा प्रभागातच उपलब्ध करणे 

१४ ) प्रभागात ठीक ठिकाणी सौर ऊर्जा दिवे बसविणे 

१५ ) प्रभागातील शाळा मध्ये सुविधा उपलब्ध करून देणे 

१६ ) प्रत्येक वस्ती मध्ये लहान मुलांना शिक्षणाची आवड व्हावी व त्यांचे शिक्षण व्हावे यासाठी अंगणवाडी ची व्यवस्था करणे 

१७ ) बालक व माता तसेच गरोदर महिलांसाठी पोषक आहार व नाव नोंदणी करण्यासाठी संबंधित विभागा कडून सुविधा उपलब्ध करणे 

१८ ) प्रभागातील महिला संघटना व मंडळातील महिलाना स्वयं रोजगार व व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करणे 

१९ ) प्रभागातील दिव्यांग नागरिकांना व विधवा तसेच निराधार महिलाना शासनाने मंजूर केलेल्या योजना संबंधित विभागा कडून मिळाव्यात या साठी सहकार्य व मार्गदर्शन करणे 

२० ) प्रभागा मधील वस्ती मध्ये घरात शौचालय असले तरी बंद पडलेले शौचालय दुरुस्ती करणे किंवा नवीन बनविणे. असे अनेक नागरी सुविधा ची कामे प्रलंबित आहेत जे पूर्ण करणे गरजेचे आहे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की 
आपले एक मत प्रभागातील विकास कामासाठी महत्त्वाचे ठरेल. 

 तसेच हरी चंदर आल्हाट म्हणाले की मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली न येता, थेट जनतेचे सेवक म्हणून मैदानात उतरत आहे. प्रभाग क्रमांक १७ मध्ये मूलभूत सोयी-सुविधांची वानवा आहे आणि विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न प्रभावीपणे सोडवण्यासाठी मी नक्कीच ही निवडणूक लढवणार आहे."
या घोषणांमुळे प्रभाग क्रमांक १७ मधील राजकीय वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात झाली आहे. 

सर्वसाधारणपणे पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवली जाते, अशा वेळी एका स्थानिक जनसेवक यांनी अपक्ष म्हणून ठाम भूमिका घेणे हे लक्षणीय मानले जात आहे.

 *पक्षांसाठी आव्हान* 

श्री. आल्हाट यांच्या निश्चित उमेदवारीमुळे प्रमुख राजकीय पक्षांना आता प्रभाग क्र. १७ मध्ये योग्य उमेदवाराची निवड करताना विशेष विचार करावा लागणार आहे. स्थानिक पातळीवर मजबूत पकड असलेल्या आल्हाट यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राजकीय पक्षांच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकंदरीत, उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या रणांगणात प्रभाग क्र. १७ मधून श्री. हरी चंदर आल्हाट यांनी आपली पहिली आणि ठाम 'एंट्री' निश्चित केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन