डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यालयास भीमराव निकम-चिलगावकर यांची सस्नेह सदिच्छा भेट
डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यालयास भीमराव निकम-चिलगावकर यांची सस्नेह सदिच्छा भेट पुणे (प्रतिनिधी) : सामाजिक, विधायक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आणि आरोग्यविषयक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड’ या मानवतावादी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यालयास (वारजे, पुणे) ‘बहुजन संग्राम’ संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा ‘वृत्तदर्शन मिडिया’चे संपादक भीमराव निकम-चिलगावकर यांनी नुकतीच सस्नेह भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत बहुजन संग्राम संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा वृत्तदर्शन मिडियाचे प्रतिनिधी मुरलीधर काळे आणि महिला आघाडीच्या महाराष्ट्र राज्य संघटन सचिव, भीमराव निकम यांच्या स्वीय सहाय्यक (पी.ए.) तथा वृत्तदर्शन मिडियाच्या प्रतिनिधी सोनल श्रीसुंदर उपस्थित होते. मान्यवरांनी सेवाकुंडाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन संघटनेचे उपाध्यक्ष नंदकिशोर शहाडे यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सेवाकुंडाच...