पोस्ट्स

2026 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*कल्याण स्टेशनच्या नीलम गल्लीत घाणीचे साम्राज्य;* के डी एम सी च्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

इमेज
*कल्याण स्टेशनच्या नीलम गल्लीत घाणीचे साम्राज्य;*  के डी एम सी च्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात कल्याण (प्रतिनिधी संजय भोराडे)   कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील अत्यंत वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या नीलम गल्लीत गेल्या तीन-चार दिवसांपासून मैलामिश्रित आणि दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असून, यामुळे या भागातील नागरिकांचे आणि प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) प्रभाग क्षेत्र ३ क अंतर्गत येणाऱ्या या महत्त्वाच्या परिसरात प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, नीलम गल्लीतील ड्रेनेज लाईन महापालिकेच्या मुख्य मलनिस्सारण वाहिनीला योग्य प्रकारे जोडलेली नाही. त्यातच परिसरातील काही लॉजिंगमधील सांडपाणी आणि टाकाऊ कचरा थेट गटारीत सोडला जात असल्याने गटारी पूर्णपणे तुंबल्या आहेत. परिणामी, अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त पाणी गटारातून बाहेर पडून थेट रस्त्यावर पसरत आहे. पूर्वी या गल्लीत डांबरी रस्ता असल्यामुळे नेहमीच चिखल होत असे. नागरिकांची ही समस्या सुटावी म्हणून य...

*बदलापूरचे डी.लिट. डॉ. वाळीबा विठ्ठल पोपेरे यांची बँकॉकमधील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड* ‘सोशल जस्टिस चॅम्पियन ऑफ द इयर’ पुरस्काराने होणार सन्मान

इमेज
*बदलापूरचे डी.लिट. डॉ. वाळीबा विठ्ठल पोपेरे यांची बँकॉकमधील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड*  ‘सोशल जस्टिस चॅम्पियन ऑफ द इयर’ पुरस्काराने होणार सन्मान  *बदलापूर / प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट :*   बदलापूरचे सुपुत्र आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी परिचित असलेले डी.लिट. डॉ. वाळीबा विठ्ठल पोपेरे यांची थायलंडमधील बँकॉक येथे होणाऱ्या ‘इंटरनॅशनल इनोव्हेटिव्ह समिट अँड अवॉर्ड्स २०२६’ (IISA) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी अधिकृत निवड झाली आहे. त्यांना या परिषदेत ‘वर्षातील सामाजिक न्यायाचे अग्रदूत’ (Social Justice Champion of the Year) या विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ‘एलिव्हेट ग्लोबल फोरम्स, बँकॉक (थायलंड)’ यांच्या वतीने या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिकपणे कार्य करणे, लोकहिताचे सामाजिक उपक्रम राबवणे, युवा नेतृत्वाला जागृत करून रोजगाराभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करणे तसेच त्यांचे नेतृत्वगुण आणि जागतिक स्तरावरील सहकार्याप्रती असलेली बांधिलकी पाहून ही निवड करण्यात आली आहे. या जागतिक स्तरावरील परिषद...

जया प्रदा यांच्या हस्ते पुण्यातील दिमाखदार सोहळ्यात गौरव;

इमेज
जया प्रदा यांच्या हस्ते पुण्यातील दिमाखदार सोहळ्यात गौरव;  विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती   *(प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट )*  पुणे इन्साइट्स सक्सेस मीडिया एलएलसी, इन्साइट्स सक्सेस मीडिया आणि ग्लोबल ह्युमॅनिटेरियन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नॅशनल प्रेस्टिज लीडरशिप अवॉर्ड्स २०२६’ हा भव्य व प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा नुकताच पुणे येथे मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न  झाला.  या सोहळ्यात महाराष्ट्र शासनाचे आदिवासी सेवक तथा ‘नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन’चे (नागपूर, महाराष्ट्र राज्य) जनरल सेक्रेटरी डी.लिट. डॉ. व्ही. व्ही. पोपेरे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल ह्युमॅनिटेरियन लीडरशिप नॅशनल अवॉर्ड २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. हा मानाचा पुरस्कार भारताच्या माजी खासदार तथा सुप्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते डॉ. पोपेरे यांना प्रदान करण्यात आला. पुणे येथील या सोहळ्यात भारतातील विविध राज्यांतील उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, उद्योजक तसेच ...

MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांना ६३ व्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांकडून शुभेच्छा

इमेज
MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांना ६३ व्या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवरांकडून शुभेच्छा मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक (MD) अनिलकुमार गायकवाड यांना त्यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व पत्रकान्वये тепर्त्य शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली. या विशेष प्रसंगी ‘बहुजन संग्राम’ या सामाजिक, विधायक व महाराष्ट्रव्यापी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा ‘वृत्तदर्शन मीडिया’ राज्यस्तरीय वृत्तसंस्थेचे संपादक भीमराव निकम चिलगावकर, बहुजन संग्रामचे ठाणे जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश संघटक मुरलीधर काळे, तसेच बहुजन संग्राम संघटना महिला आघाडीच्या महाराष्ट्र संघटन सचिव, ‘वृत्तदर्शन मीडिया’च्या विशेष प्रतिनिधी (पत्रकार) आणि प्रदेशाध्यक्ष भीमराव निकम चिलगावकर यांच्या स्वीय सहाय्यक (PA) सोनल श्रीसुंदर आदींनी अनिलकुमार गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ व सदिच्छा भेट देत वाढदिवस...

डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड सामाजिक सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या अनिलकुमार गायकवाड यांनी अनिलकुमार गायकवाड यांच्या ६३ व्या वाढदिवसाप्रित्यर्थ २४/१०/२०२६ ते ३०/१०/२०२६ या हप्ताभराच्या कालावधीत मानवता सप्ताह जाहीर

इमेज
डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड सामाजिक सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या अनिलकुमार गायकवाड यांनी अनिलकुमार गायकवाड यांच्या ६३ व्या वाढदिवसाप्रित्यर्थ २४/१०/२०२६ ते ३०/१०/२०२६ या हप्ताभराच्या कालावधीत मानवता सप्ताह जाहीर केल्यानुसार, अविरत परिश्रम  घेऊन विविध धार्मिक, सामाजिक,  सांस्कृतिक, आरोग्यदायक, लोकोपयोगी उपक्रम राबवले त्याबद्दल अश्वजित भैय्या अनिलकुमार गायकवाड यांच्या निवासस्थानी  बहुजन संग्राम संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव निकम चिलगावकर, ठाणे जिल्ह्याध्यक्ष सचिन गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश संघटक मुरलीधर काळे, बहुजन संग्राम संघटनेच्या महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश संघटन  सचिव वृत्तदर्शन मिडीया सर्व्हिसेसच्या  महाराष्ट्रप्रदेश  विशेष प्रतिनिधी व प्रदेशाध्यक्ष भीमराव निकम चिलगावकर यांच्या स्वीय सहाय्यक (P.A) सोनल श्रीसुंदर, बहुजन संग्राम संघटनेचे ठाणे जिल्हा संघटक  व चित्रपट निर्माते विलास कुडाळकर आदी  मान्यवर नेत्यांनी अश्वजित भैय्या गायकवाड यांना  भरभरून शुभेच्छा दिल्या.

सामाजिक न्याय विभाग, समाज कल्याण जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

इमेज
सामाजिक न्याय विभाग, समाज कल्याण जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन उल्हासनगर :वसतिगृह येथे करण्यात आले होते, चवदार तळे, महाड सत्याग्रह- एक सामाजिक नांदी, या विषयावर वकृत्व स्पर्धा होती,त्यात जिल्ह्यातील सर्व वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला व उत्कृष्ट वकृत्व केलेल्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले,  या स्पर्धेला समाज कल्याण निरीक्षक श्री.ज्ञानेश़वर धोंडकर साहेब यांचे मार्गदर्शन लाभले आणि श्री.भालचंद्र झुंजारराव सर, श्री. सुनील सुरवाडे सर, श्री. सर्जेराव खैरनार सर व श्री.दीपक भोये सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे अतिशय उत्कृष्ट आयोजन उल्हासनगर येथील वसतिगृह अधीक्षक श्री. अश्वजीत मैत्रक सर यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भालचंद्र झुंजारराव सरानी केले, तसेच सदर कार्यक्रम प्रसंगी श्री.किरण संग्रामपूर कर व श्री.विलास पवार सर तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व अधीक्षक,अधीक्षिका व स्पर्धेत भाग घेणारे विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते,कार्यक्रमाचा स...

*जनसामान्यांचे आधारस्तंभ आणि MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड

इमेज
*जनसामान्यांचे आधारस्तंभ आणि MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड *  महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला गती देणारे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव, मा. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड साहेब आज वयाची ६२ वर्षे पूर्ण करून ६३ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. सहाय्यक अभियंता (श्रेणी-१) या पदापासून आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात करत, प्रशासकीय सेवेच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचलेला त्यांचा हा ३५ वर्षांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने वाढदिवस आणि 'सेवाभावी सप्ताह' महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून आणि समाजभानाचे भान राखत, डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी आपला यंदाचा ६३ वा वाढदिवस कोणताही थाटमाट न करता अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत, २४ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संपूर्ण लातूर जिल्ह्यात विविध सामाजिक, वैद्यकीय आणि मानवतावादी उपक्रमांचा 'स...

*दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा वाढदिवस साधेपणाने ;* आठवडाभर विविध सामाजिक व मानवतावादी उपक्रमांची रेलचेल

इमेज
*दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा वाढदिवस साधेपणाने ;* आठवडाभर विविध सामाजिक व मानवतावादी उपक्रमांची रेलचेल लातूर: महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून, समाजभानाची जपणूक करत डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांनी आपला ६३ वा वाढदिवस कोणताही थाटमाट न करता अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन २४ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संपूर्ण लातूर जिल्ह्यात विविध सामाजिक, वैद्यकीय आणि मानवतावादी उपक्रमांचा 'सेवाभावी सप्ताह' राबवण्यात आला  आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात या सेवाभावी सप्ताहाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा पीडित कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत आणि दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय, वृद्धाश्रम तसेच अनाथालयातील मुलांना नवीन कपडे आणि फराळ देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलवण्यात आले आहे. लातूर जिल्हा '...

एक दिलदार राजा अन् माणसातील देवमाणूस:* डॉ. अनिलकुमार गायकवाड साहेब!

इमेज
* एक दिलदार राजा अन् माणसातील देवमाणूस:*  डॉ. अनिलकुमार गायकवाड साहेब! — भीमराव निकम - चिलगावकर (कार्यकारी संपादक, बातमी जनहित वृत्तपत्र | प्रदेशाध्यक्ष, बहुजन संग्राम | संपादक, वृत्तदर्शन मीडिया सर्व्हीसेस) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक (MD) तथा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव मा. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड साहेब आज वयाची ६३ वर्षे पूर्ण करून ६४ व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. सहाय्यक अभियंता (श्रेणी-२) या पदापासून ते प्रशासनातील सर्वोच्च शिखरापर्यंतचा त्यांचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आहे. या शुभप्रसंगी त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय आणि सामाजिक प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा!  *३५ वर्षांचे ऋणानुबंध अन् आधारस्तंभ*  गायकवाड साहेब आणि माझी मैत्री ही तब्बल ३० ते ३५ वर्षांपूर्वीची—म्हणजेच ते सहाय्यक अभियंता श्रेणी-२ म्हणून कार्यरत असल्यापासूनची आहे. केवळ एक सनदी अधिकारी म्हणून नव्हे, तर समाजाचे जिवाभावाचे, संकट काळातील खंबीर मित्र आणि माझे आधारस्तंभ म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. माझ्या कौटुंबिक प्रवा...

कल्याण ते चवदार तळे महाड व्हाया गांधार पाले लेणी ते कल्याण : बस प्रवासात रंगले अनोखे चालते फिरते साहित्य संमेलन

इमेज
* चवदार तळे ते गांधारपाली लेणी:* बसप्रवासात रंगले अनोखे ‘चालते-फिरते साहित्य संमेलन’ चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त महाड येथे ‘पेटले महाडचे पाणी’ कविता संग्रहाचे मुखपृष्ठ अनावरण  *कल्याण (प्रतिनिधी आशा रणखांबे):*  चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीचे औचित्य साधत आणि कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने ‘सार्थक साहित्य प्रकाशन’ आणि ‘चवदार तळे सत्याग्रह शताब्दी समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक आगळावेगळा साहित्यिक उपक्रम नुकताच पार पडला. नवनाथ रणखांबे (कल्याण) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ‘चवदार तळे आणि गांधारपाली लेणी बसमधील चालते-फिरते साहित्य संमेलना’ने उपस्थितांचे लक्ष वेधले. कल्याण ते महाड आणि महाड ते गांधारपाली लेणी असा बसप्रवास करत असताना साहित्य, कविता, वैचारिक मंथन, गझल आणि धम्मसहलीचा सुंदर संगम या निमित्ताने अनुभवयास मिळाला. या स्तुत्य उपक्रमाचे उद्घाटन साहित्यिक भीमराव रायभोळे (अंबरनाथ) आणि कवी तथा पाचपीर ट्रस्टचे संचालक शाम बैसाने (पवई, मुंबई) यांच्या हस्ते झाले. बसप्रवासालाच एका साहित्यिक विचारपीठाचे स्वरूप प्राप्त क...

बळीराजाच्या मदतीसाठी उल्हासनगर (पूर्व) युवासेनेचा पुढाकार: ५० हजारांची मदत सुपूर्द

इमेज
बळीराजाच्या मदतीसाठी उल्हासनगर (पूर्व) युवासेनेचा पुढाकार: ५० हजारांची मदत सुपूर्द उल्हासनगर: महाराष्ट्रातील बळीराजावर ओढवलेल्या दुष्काळाच्या संकटात आधार देण्यासाठी उल्हासनगर (पूर्व) युवासेनेच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेनेचे नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ५०,००० रुपयांचा धनादेश खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आला. शेतकऱ्यांप्रती सामाजिक बांधिलकी जपत कठीण प्रसंगात त्यांना धीर देण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याची भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास युवासेना कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष जितेन पाटील, उपजिल्हाध्यक्ष युवराज पाटील, उपशहर अध्यक्ष सिद्धांत रमेश चव्हाण, शेखर भीमराव सपकाळे, युवासेना सचिव गौरव भानुशाली, चिटणीस प्रवीण करीरा, उपशहर अध्यक्ष अक्षय मांडुळकर, विभाग अध्यक्ष भावेश शेजुळे, उप...

उल्हासनगरात जागतिक बेघर दिनानिमित्त 'पर्णकुटी बेघर निवारा केंद्र' येथे दानशूर सत्कार सोहळा संपन्न

इमेज
उल्हासनगरात जागतिक बेघर दिनानिमित्त 'पर्णकुटी बेघर निवारा केंद्र' येथे दानशूर सत्कार सोहळा संपन्न  जागतिक बेघर दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर येथील 'पर्णकुटी बेघर निवारा केंद्र' यांच्या वतीने एका विशेष दानशूर सत्कार समारंभाचे शानदार आयोजन करण्यात आले होते.  समाजातील बेघरांना निवारा, अन्न आणि मदतीचा आधार देणाऱ्या दानशूर व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या योगदानाचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. हा सोहळा १० ऑक्टोबर २०२६ रोजी उल्हासनगर कॅम्प नंबर ३ मधील गुरुगोविंद हायस्कूलच्या मागे असलेल्या 'पर्णकुटी बेघर निवारा केंद्र' येथे अतिशय उत्साहात पार पडला. या प्रसंगी निवारा केंद्राला निरंतर सहकार्य व मोलाची मदत करणाऱ्या दानशूर व्यक्ती आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला सामाजिक, पत्रकारिता, कला आणि शैक्षणिक, आणि सामाजिक क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती....

उल्हासनगर में ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान के तहत श्रमदानसिमरन सेवा प्रतिष्ठान’ को सम्मान पत्र देकर किया गया सम्मानित

इमेज
उल्हासनगर में ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान के तहत श्रमदान सिमरन सेवा प्रतिष्ठान’ को सम्मान पत्र देकर किया गया सम्मानित उल्हासनगर : स्वच्छता ही सेवा - २०२६' अभियान के अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिका द्वारा सामूहिक स्वच्छता, श्रमदान और जनजागरूकता कार्यक्रमों का सफल आयोजन किया गया  इस अभियान के तहत १ अक्टूबर २०२६ को "एक दिन, एक घंटा, एक साथ" की संकल्पना पर आधारित छत्रपति शिवाजी महाराज चौक से शांतिनगर वेलकम गेट तक विशाल स्वच्छता अभियान एवं श्रमदान आयोजित किया गया था उल्हासनगर महानगरपालिका के स्वास्थ्य विभाग द्वारा आयोजित इस स्वच्छता अभियान में सामाजिक संस्था 'सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ के पदाधिकारियों और स्वयंसेवकों ने महानगरपालिका के अधिकारियों व सफाई कर्मचारियों के साथ मिलकर बड़े पैमाने पर सक्रिय योगदान दिया  स्वच्छता, श्रमदान और जनजागरूकता से जुड़े विभिन्न उपक्रमों में लोगों ने उत्साहपूर्वक भाग लिया स्वच्छ, सुंदर और स्वस्थ उल्हासनगर के निर्माण में उत्कृष्ट योगदान के लिए महानगरपालिका परिसर में 'एप्रिसिएशन सेलिब्रेशन' ...

उल्हास नदीच्या पाण्याचा लालसर रंग; कर्जतच्या चिल्हार नदीकाठावरील बेसुमार डोंगर कटिंग आणि मातीचा भराव कारणीभूत?

इमेज
उल्हास नदीच्या पाण्याचा लालसर रंग; कर्जतच्या चिल्हार नदीकाठावरील बेसुमार डोंगर कटिंग आणि मातीचा भराव कारणीभूत ?   उल्हास नदी बचाव कृती समिती आणि पर्यावरणप्रेमींची प्रत्यक्ष पाहणी   अभिनंदन लोधा प्रकल्पाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड व उत्खनन उघड   वैज्ञानिक तपासणीची आणि संयुक्त पंचनाम्याची मागणी बदलापूर: गेल्या काही दिवसांपासून अचानक उल्हास नदीचे पाणी लालसर व गढूळ झाले होते उल्हास नदीच्या गढुळ पाण्याची बातमी सुद्धा प्रसारित झाली होती उल्हास नदीच्या पाण्याचा नेमका स्रोत शोधण्यासाठी उल्हास नदीच्या वरच्या प्रवाहापासून विविध भागांत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान कर्जतजवळील पिंपळोळी परिसरातील चिल्हार नदीकाठावर सुरू असलेले अभिनंदन लोधा कंपनीचे १८० एकर क्षेत्रातील प्लॉटिंग प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणातील डोंगर कटिंग हा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची वैज्ञानिक तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी उल्हास नदी बचाव कृती समितीने केली आहे. डोंगर कटिंग व भुस्खलनाचा धोका पिंपळोळी परिसरा...

28 सप्टेंबर 2026 सोमवार अंक साप्ताहिक बातमी

इमेज
28 सप्टेंबर 2026  सोमवार अंक साप्ताहिक बातमी