पोस्ट्स

जनहित न्यूज महाराष्ट्र ९९६०५०४७२९ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

*प्रा एन डी पाटील वैज्ञानिक जाणीव प्रकल्प अभियान उल्हासनगर येथे संपन्न*

इमेज
*प्रा एन डी पाटील वैज्ञानिक जाणीव प्रकल्प अभियान उल्हासनगर येथे संपन्न* उल्हासनगर प्रतिनिधी.       दिनांक २८ जुलै २०२२ रोजी श्री आर के अभंग माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा उल्हासनगर यांच्या वतीने प्रा.एन डी पाटील   वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियाना अंतर्गत कार्यक्रम मोठया उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशनल सोसायटीच्या सचिव सन्माननीय सौ देविका संजय अंभग  मॅडम यांच्या हस्ते विवेकाच्या  दिव्यांचे दीप प्रज्वलन करून करण्यात आले.  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ  देविका अंभग यांनी स्वीकारले. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री अशोक वानखेडे, डोंबिवली शाखा कार्याध्यक्ष श्री उदय देशमुख सर, स्मिता मिरपगार मॅडम, सिंधुताई रामटेके मॅडम, श्री आर के अभंग माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ हजारे मॅडम उपस्थित होत्या.  या कार्यक्रमात श्री अशोक वानखेडे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोण या विषयावर काही प्रात्यक्षिकांसह सखोल मार्गदर्शन केले. तर बबन

डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय उदघाट्न सोहळा संपन्न

इमेज
डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय उदघाट्न सोहळा संपन्न डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थे मार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचा उदघाट्न सोहळा नवरेनगर अंबरनाथ पूर्व येथे संपन्न झाला. अंबरनाथचे प्रसिद्ध बिल्डर, माजी नगराध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र चिटणीस श्री गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचा उदघाट्न सोहळाआयोजित करण्यात आला होता.श्री गुलाबराव  करंजुले यांनी भारतीय राज्य घटना (संविधान ), बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन चरित्र ग्रंथाचे विमोचन करून वाचनालयाचे उदघाट्न केले. डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल हंडोरे यांनी प्रस्तविक केले. वाचनालयात स्पर्धा परीक्षा केंद्र, गरीब विद्यार्थांसाठी काम्पुटर प्रशिक्षण, आदी उपक्रम राबविण्यात येतील असे ही हंडोरे म्हणाले. या प्रसंगी महाराष्ट्र ओबीसी सेलचे सचिव अजित खरात, गांधी विद्यालयाचे अध्यक्ष दिलीप कणसे यांची भाषणे झाली. या वेळी कल्याण जिला उपाध्यक्ष संजय आदक, माजी नगरसेवक संदीप तेलंगे, भरत फुलोरे, अंबरनाथचे भाजपा अ

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीत सामावून घेण्याची मागणी

इमेज
 शाषनाच्या सामाजीक न्याय विभागाने साहीत्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महापुरुष नाहीत अस वक्तव्य करुन त्यांचे नाव महापुरुषांच्या यादीतुन वगळन्यात आले   याच घटनेचा निषेध करुन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रणेते , पोवाडे , कादंबऱ्या, कथा . साहीत्या मधुन समाज जागृती चे कार्य करणारे अण्णाभाऊ महापुरुष नाहीत का असा सवाल केला  व अण्णाभाऊंचे नाव महापुरुषांच्या यादीत समाऊन घेण्याची मागनी उल्हासनगर तहसीलदार कार्यालयात भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेनेच्या वतीने निवेदन पत्राद्वारे करण्यात आली या वेळी. युवा लहुजी सेना प्रमुख. रघुनाथ खैरनार.  प्रदेश अध्यक्ष सुनील दुसेजा. महीला आघाडी अध्यक्षा सौ रेखा शेलार. जिल्हा अध्यक्ष रंजीत साळवे. सर जिल्हा अध्यक्ष जयराज ससाणे. संघटना प्रमुख ज्ञानेश्वर चंदनशीव . समाज सेवक चंदु विरशीद. विलास गायकवाड. रतन काकफळे. उपस्थित होते