*प्रा एन डी पाटील वैज्ञानिक जाणीव प्रकल्प अभियान उल्हासनगर येथे संपन्न*

*प्रा एन डी पाटील वैज्ञानिक जाणीव प्रकल्प अभियान उल्हासनगर येथे संपन्न*
उल्हासनगर प्रतिनिधी.      
दिनांक २८ जुलै २०२२ रोजी श्री आर के अभंग माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा उल्हासनगर यांच्या वतीने प्रा.एन डी पाटील   वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियाना अंतर्गत कार्यक्रम मोठया उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशनल सोसायटीच्या सचिव सन्माननीय सौ देविका संजय अंभग  मॅडम यांच्या हस्ते विवेकाच्या  दिव्यांचे दीप प्रज्वलन करून करण्यात आले. 
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ  देविका अंभग यांनी स्वीकारले.
प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री अशोक वानखेडे, डोंबिवली शाखा कार्याध्यक्ष श्री उदय देशमुख सर, स्मिता मिरपगार मॅडम, सिंधुताई रामटेके मॅडम, श्री आर के अभंग माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ हजारे मॅडम उपस्थित होत्या. 
या कार्यक्रमात श्री अशोक वानखेडे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोण या विषयावर काही प्रात्यक्षिकांसह सखोल मार्गदर्शन केले. तर बबन नागले सरांनी जादूच्या प्रयोगातून वैज्ञानिक दृष्टिकोण विद्यार्थ्यांमध्ये कसा रुजल्या जाईल असे विद्यार्थ्याच्या बुद्धिला चालना देणारे विविध प्रयोगाचे प्रात्यक्षिकांसह सादरीकरण केले व प्रयोग करतांना योग्य काळजी कशी घ्यावी या बाबतीत देखील मार्गदर्शन केले.
 उदय देशमुख यांनी सुंदर बोध पर  गोष्ट सांगितली. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात   देविका अंभग मॅडम  यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आजच्या काळात वैज्ञानिक दृष्टिकोण जोपासने फार अवश्यक आहे, त्यासाठी त्यांनी वेळो वेळी प्रयोगशील राहणे आवश्यक आहे असे मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच ह्या कार्यक्रमांच्या माध्यमातून  शाळेतील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल आयोजकांचे संस्थेच्या वतीने आभार मानले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा उल्हास नगर चे सचिव बबन सोनावणे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सन्माननीय संजय भामरे सरांनी अतिशय सुरेख केले. 
आभार सोनावणे सरांनी मानले.
एकदंरीत कार्यक्रम मोठय़ा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार