डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय उदघाट्न सोहळा संपन्न
डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय उदघाट्न सोहळा संपन्न
डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थे मार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचा उदघाट्न सोहळा नवरेनगर अंबरनाथ पूर्व येथे संपन्न झाला.
अंबरनाथचे प्रसिद्ध बिल्डर, माजी नगराध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र चिटणीस श्री गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचा उदघाट्न सोहळाआयोजित करण्यात आला होता.श्री गुलाबराव
करंजुले यांनी भारतीय राज्य घटना (संविधान ), बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन चरित्र ग्रंथाचे विमोचन करून वाचनालयाचे उदघाट्न केले.
डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल हंडोरे यांनी प्रस्तविक केले. वाचनालयात स्पर्धा परीक्षा केंद्र, गरीब विद्यार्थांसाठी काम्पुटर प्रशिक्षण, आदी उपक्रम राबविण्यात येतील असे ही हंडोरे म्हणाले. या प्रसंगी महाराष्ट्र ओबीसी सेलचे सचिव अजित खरात, गांधी विद्यालयाचे अध्यक्ष दिलीप कणसे यांची भाषणे झाली. या वेळी कल्याण जिला उपाध्यक्ष संजय आदक, माजी नगरसेवक संदीप तेलंगे, भरत फुलोरे, अंबरनाथचे भाजपा अध्यक्ष अभिजित करंजुले, मुंबईचे समाजसेवक मनोज खरात, विनायक सोसायटीचे अध्यक्ष काका कांबळे, समाजसेवक श्री निंबाळकर, भूमिपुत्र पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत मोटे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त पद्मा इंगळे, नलिनी हंडोरे, महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुनीता खैरनार, समाजसेविका लता डोंगरे, अनिता साळवे, मंगल पवार, ललिता बनसोडे, वैशाली नाईक, संगीता गवांदे, अनिता रणदिवे, ललिता जाधव, पार्वतीबाई उबाळे, मनीषा विश्वकर्मा, रीमा खैरे, रचना तांबे, सविता म्हेत्रे, रुपाली बगाटे, गोकोर्णा कांबळे आदी महिला कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री गौतम परघणे, त्रिभुवन जयस्वार, प्रियांत हंडोरे, रामनयन विश्वकर्मा आदींनी विशेष परिश्रम घेतले.
अशी माहिती राहुल हांडोरे यांनी दिली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद