पोस्ट्स
साप्ताहिक उद्देश विकास चा ७ वा. वर्धापन दिवस साजरा.साप्ताहिक उद्देश विकास चा ७ वां वर्धापन दिनानिमित्त समाज सेवक व संपादक पत्रकार यांना संपादक माननीय सोमविर भगवाने यांच्या वतीने २०२१ चे केलेंडर तसेच समान पत्र देवून सत्कार करण्यात आलाया वेळी टीम ओमी कालानी चे प्रमुख माननीय. ओमी कालाणी. आणि यु टी ए अध्यक्ष माननीय सुमित चक्रवर्ती. रमेश आहुजा. तसेच टी ओ के चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते. रवि खैरालिया. रवि राज खैरालीया. श्याम भाऊ जांबोलीकर. . दीपक साठे. शरद घुडे. शशिकांत दायमा. महेश अमेसर. सुशील पंजाबी. तसेच अनेक मान्यवर. व पत्रकार उपस्थित होते जनहित न्यूज महाराष्ट्र. उल्हासनगर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आनंदाची बातमी ९ महिन्याच्या प्रतिक्षे नंतरमुंबईतील पाहिले नाट्य गृह सुरू दामोदर नाट्य गृह ( परेल ) येथील शुक्रवार 25 डिसेंम्बर (नाताळ सुट्टी ) दुपारी 4 वाजता23 सप्टेंबर ला मुंबई तुफानपाऊस पडला आणि परेल येथील दामोदर हॉल येथे पाणी भरले आणि खूप नुकसान झाले होते तरी ही दामोदर हॉल चे संचालक मंडळ आणि दामोदर हॉल ची पूर्णआजी माजी व्यवस्थपक टीम यांनी ताबडतोब युद्ध पातळीवर काम करून नाट्य गृह छान तयार करून सरकार च्या आदेश ची वाट पाहत बसले होते.आणि 5 नोव्हेंबर रोजी रंग भूमी दिनी आज पासून नाट्य गृह सुरूही बातमी समजली तरी पण सगळे निर्माते शांत,मुबंई सोडून बाहेर ची नाट्य गृह सुरू झाली आहेत. पण आपल्या मुंबई ही महाराष्ट्र ची राजधानी तिकडे नाट्य गृह अजून ही सुरू नाही ह्याचं वाईट वाटलं आणि एक तरी नाट्यगृह माझ्या माय बाप रसिक प्रेषक यांच्या साठी नाटक सुरू झाले पाहिजे.असा ठाम विश्वास घेऊन बुकिंग क्लार्क आणि व्यवस्था पक सचिव हरी पाटणकर हया नात्याने नाट्य गृह सुरू झाले पाहिजे म्हणूनआजी माजी व्यवस्थापक .बाबू राणे,पाटील साहेब. आणि दामोदर नाट्य गृह चे सोशल सर्व्हिस लिंगचे संचालक श्री. आनंद माईणकर - अध्यक्ष श्री. विजय वर्टी - ऊपाध्यक्ष श्री. चंद्रकांत खोपडे - सचिव यांच्या बरोबर चर्चा करून नाट्य गृह आपल्या रसिक प्रेषक यांच्या साठी शुक्रवार 25 डिसेंबर हया दिवसा पासून नाट्य गृह आपल्या रसिक प्रेषक यांच्या साठी सुरू करत आहोत सगळ्यांचे खूप खूप आभारी आहोत.मुबंई मधील पाहिले नाटय गृह सर्व महाराष्ट्र सरकार नि दिलेले नियमावली पाळून आणि माननीय मान्य वरयांच्या उपस्थित तदामोदर नाट्य गृह सुरू
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*विकास प्रबोधिनी* या रजिस्टर्ड संस्थेच्या विद्यमाने थोर विचारवंत व कृतीशील साहित्यिक आदरणीय शिवा इंगोले सर यांच्या सन्माननीय अध्यक्षतेखाली ७ व्या आंबेडकरी साहित्यसंमेलनाचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. त्या प्रित्यर्थ आज दिनांक - ०६.१२.२०२० रोजी उल्हासनगर येथे आयोजित बैठकीमध्ये महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून डॉ बाबा साहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले तसेच प्रस्तावित साहित्य सम्मेलनाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय शिवा इंगोले सर यांच्या अभिनंदनाचा कार्यक्रम पार पडला. या निमित्त राम साबळे, शिवा इंगोले, श्रीकृष्ण टोबरे एस एस ससाने, रोहित साळवे आदी सम्मेलन समितीच्या पदाधिकाऱ्यासह अनेक मान्यवर सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकृष्ण टोबरे, अध्यक्ष विकास प्रबोधिनी यांनी केले. प्रस्तावित ७व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शिवा इंगोले यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित होऊन, उपस्थितांनी शिवा इंगोले यांना शुभेच्छा दिल्या.ह्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजय वाघमारे यांनी केले व आभार प्रदर्शन अनिल भालेराव यांनी केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सिनेकलाकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश...**कलाकारांचे प्रश्न शासनामार्फत सोडवण्याची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ग्वाही...* दिनांक ३ डिसेंबर २०२० जनहित न्यूज महाराष्ट्र संपादक हरी आल्हाट. ........................................................................मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सिने-नाट्य कलाकार, लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि तंत्रज्ञांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अजित पवार यांनी सर्व कलाकारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक संजय भोसले, वेशभुषा व केशभुषाकार श्रीमती हिना मोमीन, नृत्य दिग्दर्शिका श्रीमती अॅग्नीस हेमिल्टन, दिग्दर्शक-निर्माते-अभिनेते गजानन चव्हाण, लेखक-कवी चंद्रकांत साळसकर, लेखक- दिग्दर्शक-अभिनेते सुबोध पवार, ज्येष्ठ निर्माते भास्कर ताकवले, अभिनेता तुषार साळी, अभिनेत्री श्रीमती स्नेहल निंबाळकर, ज्येष्ठ अभिनेते मधुकर सोलकर, निर्माती- दिग्दर्शक श्रीमती पूजा श्रीवास्तव, ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते पितांबर काळे, ज्येष्ठ अभिनेते नरेंद्र दांडेकर, ज्येष्ठ अभिनेता- दिग्दर्शक हृद्यनाथ राणे, ज्येष्ठ नाट्य व्यवस्थापन. संघ प्रमुख हरी पाटणकर, चित्रकार निलेश मोहिते, अभिनेता विजय कंक, निर्माते- दिग्दर्शक सुधीर पेडणेकर, नृत्य-दिग्दर्शक किरण लोटे, जेम्स कुवेल, जयंत कोपरकर, विनय साळसकर, निसार खान, नासीर कुरेशी अशा अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट-साहित्य-कला-सांस्कृतिक विभागात प्रवेश केला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पक्षात स्वागत केले. कला-सांस्कृतिक विभागामार्फत पुढील काही दिवसात सर्व सदस्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. कलाकारांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर शासनामार्फत तोडगा काढण्याचे काम आम्ही नक्की करु अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, चित्रपट-साहित्य-कला-सांस्कृतिक विभागाचे मुंबई अध्यक्ष मनोज व्यवहारे उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स