पोस्ट्स
राज्यात कडक निर्बंध लागू मागील काही दिवसांत करोनानं अक्षरक्षः थैमान घातल्यानं राज्य सरकारची झोप उडाली आहे. प्रचंड वेगानं होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण येण्यास सुरूवात झाली असून, रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन संदर्भात चाचपणी सुरू होती. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज लॉकडाउन/ कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.काय आहेत नेमके कडक निर्बंध;शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत लॉकडाऊनलोकल ट्रेन सुरू राहणारजिम बंद होणारअत्यावश्यक सेवांना परवनगीरेस्टॉरंट, मॉल टेक अवे सर्व्हिस सुरु राहणारअत्यावश्यक सेवेतील लोकांनाच गाडी चालण्याची परवानगीरात्री केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतीलधार्मिक स्थळांवर निर्बंध असतीलसिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णत: बंदगार्डन, मैदाने बंदजिथे केसेस वाढतायेत तेथील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनालासिनेमा, मालिकांचे शुटींग मोठ्या संख्येनं करता येणार नाहीरिक्षा- ड्रायव्हर + २ लोकबसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईलटॅक्सीत मास्क घालावाकार्यालयांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याच्या सूचनामंत्रालय, महत्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदीचित्रपट शूटिंगला परवानगी आहे, पण गर्दी करू नये, लढाई, आंदोलन असे सीन असतील त्या शूटिंगला बंदीबाजारपेठांमध्ये मर्यादित संख्येनं सोडलं जाईलशाळा कॉलेज बंद, इंडस्ट्री चालू राहतीलप्रतिबंधित क्षेत्र तयार करासोसायटीच्या बाहेर बोर्ड लावायचा अन्यथा दंड आकारणार २० लोकांना अंत्यविधींसाठी परवानगीलग्नसमारंभांबाबत लोकांची संख्या मर्यादितविमान प्रवासाबाबत कोणतेही बदल नाहीत मात्र, टेस्टिंग कडक करणार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्ग चा उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जात आहे, मात्र तरी देखील रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. काल दिवसभरात राज्यात ४७ हजार ८२७ नवीन करोनाबाधित आढळले असून, २०२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.९१ टक्के एवढा आहे.दरम्यान, कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. आपण सगळे एकजुटीने लढत आहोत ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी व त्यांच्या मनातली भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्यास सहकार्य करावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.ते आज वृत्तपत्रांचे संपादक, मालक, वितरक यांच्याशी दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत बोलत होते. याप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सचिव सीताराम कुंटे, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी यावेळी संसर्ग रोखण्यासाठी प्रामुख्याने इतर काही पर्याय आहेत का ते सर्वांकडून जाणून घेतले व सुचना स्वीकारल्या.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नवीमुंबई दिनांक.२/४/२०२१ जनहित लोकशाही पार्टी चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अशोकराव आल्हाट यांचा वाढदिवस नवीन मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात आला.या वेळी खास करून हा वाढ दिवस एक आगळा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला प्रत्येकजन वाढ दिवसा निमित्त केक कापतात परंतु अशोक राव आल्हाट यांचा वाढदिवस मात्र कलिंगडे कापून साजरा करण्यात आला. या बाबत जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक यानी कलिंगड कापून वाढ दिवस साजरा केला या मागचा उद्देश काय ? हा प्रश्न विचारला असता . अशोक राव आल्हाट यांनी या मागचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले सध्या आपल्या देशात शेतकरी हवालदिल झाले असून अनेक शेतकरी कर्ज बाजारी होऊन शेती व फळ बागे लावीत आहेत. म्हणून आम्ही वाढ दिवसाला केक न कापता कलिंगडे कापून महाराष्ट्रातील जनतेला संदेश देण्याचा प्रयत्न केला की रोज लाखो लोकं केक कापून वाढ दिवस साजरा करतात जर लाखो लोकांनी कलिंगडे किंवा इतर फळे कापून वाढ दिवस साजरे केले तर याचा फायदा नक्कीच महाराष्ट्रातील शेतकरी जनतेला होणार. हे नक्की. यावेळी संतोष दादा चौधरी यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.व नवीन मुंबई पदाधिकारी यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देवून,हा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रिक्षा-आणि कार चा भीषण अपघात रिक्षातील तिघांचा होरपळून मृत्यू कर्जत कल्याण राज्यमार्गावर कारने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षातील सीएनजी सिलेंडरचा स्फोट होऊन तिघांचा मृत्यू झाला. तर कारमधील तिघेजण किरकोळ जखमी झाले असून, नेरळ पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेल्या कारचालकाला ताब्यात घेतले आहे. 29 मार्च रोजी सकाळी ही दुर्घटना घडली. बदलापूर येथील कुळगाव भागात राहणारे सुभाष जाधव हे रिक्षा (एमएच 05-सीजी 4351) घेऊन पत्नी शुभांगी यांच्यासह सकाळी कर्जतमधील नेरळ पाडा येथे आले. तेथे राहणार्या सरिता मोहन साळुंखे यांना सोबत घेऊन ते कर्जतला गेले. सरिता साळुंखे या रिक्षाचालक जाधव यांच्या मेहुणी असून त्या नेरळ येथील अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. कर्जत येथील कामे उरकून जाधव हे रिक्षा घेऊन कर्जत-कल्याण राज्यमार्गाने नेरळकडे येत होते.गारपोली गावाचा जोडरस्ता ओलांडून रिक्षा सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर येत असताना कल्याण येथून कर्जत रस्त्याने जात असलेल्या हुंडाई एक्सेंट कारने रिक्षाला समोरून धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की रिक्षाचालक यांच्या सीट खाली असलेला सीएनजी सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यांच्यापैकी एकही व्यक्ती बाहेर पडू शकली नाही. रिक्षाचालक सुभाष जाधव, शुभांगी जाधव (दोघे रा.बदलापूर) यांच्यासह सरिता साळुंखे यांचा होरपळून मृत्यू झाला दोन्ही वाहने जळून खाक झाली होती. रिक्षामधील कागदपत्रांवरुन अपघातात जळालेल्या व्यक्तींची ओळख पटली. तर कारमधील तिघे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत.कारचालकास नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रतिनिधी दिलीप वाघ कर्जत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स