पोस्ट्स
जुन्नर - जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक गावातील जेष्ठ नागरिक रामचंद्र काशिनाथ आल्हाट यांचे वयाच्या ९९व्या वर्षी दिनांक 11 ऑक्टोंबर 2021 रोजी निधन झाले आहे.त्यांनी मोठ्या कष्टातुन आपला परीवार उभा केला असुन त्यांचे मुळ गाव संगमनेर तालुक्यातील धांदरफळ हे त्यांचे गाव आहे अनेक वर्षापूर्वी ते जुन्नर तालुक्यातील शिरोली येथे स्थायिक झाले होते.त्यांनी कष्ट हाच देव मानत त्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला व आपल्या चार मुलांवर अतिशय चांगले संस्कार करत मुलांना समाजिक कार्याची आवड निर्माण केली आहे.अतिशय कष्टमय जीवन जगत त्यांनी आपल्या घामाने संसार व शेती खुलवली असुन आपल्या मधुर वाणीमुळे व कष्टमय स्वभावामुळे ते खोडद व शिरोली,बु. पंचक्रोशीत प्रसिध्द होते तसेच जुन्या पिढीतील घटनांचा साक्षीदार म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जात होते.त्यांनी शेती मध्ये राबताना वेगवेगळे प्रयोग राबवले होते.दुरदुर्शनवर लोकप्रिय असलेल्या "आमची माती, आमची माणसं" या एका माहितीपटा मध्ये कोबीचे दुबार पिक घेतल्याने त्यांची विशेष मुलाखत ही पार पडली होती कारण त्यांनी केलेला प्रयोग हा पूर्णपणे सफल झाला होता तसेच.त्यांना विविध संघटना व संस्था यांनी आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन ही गौरवले होते.अतिशय मधुर वाणीचे असलेले रामचंद्र काशिनाथ आल्हाट हे उतारवयामुळे अलीकडे आजारी होते.काल त्यांचे निधन झाले त्यांचा अंत्यविधी शिरोली गावातील स्मशानभुमीत काल सात वाजता पार पडले यावेळी त्यांचे पाथर्डी, अकोले,संगमनेर,मुंबई परिसरातून नातेवाईक,स्नेही यावेळी उपस्थित होते.त्यांचा लोकप्रिय स्व.खासदार निवृत्ती शेरकर यांच्या कुटुंबाशी विशेष स्नेह होता.त्यांनी शेवट पर्यंत जपण्याचे काम त्यांनी केले.त्यांच्या जाण्यामुळे जुन्या पिढीतील व धार्मिक क्षेञातील एक अभ्यासु व्यक्तीमत्व हरपल्याची भावना समाज्यातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.मातंग समाज्यात ही त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जात असत कारण सामजिक चळवळीच्या बाबतीत नेहमीच राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांना ते मार्गदर्शन करत असत.आपल्या परीवारातील व नात्यातील प्रत्येक गोष्टींंची माहिती घेत असत व चुकीच्या होणाऱ्या गोष्टींना ते सष्टपणे विरोध करण्याचा त्यांचा स्वभाव होता.त्याच कारणामुळे त्यांचा नातेवाईक व मातंग समाज्यात आदरयुक्त दबदबा त्यांचा होता.त्यांच्या मागे दोन भाऊ शंकर व महादेव आल्हाट तसेच चार मुले व सुना आहेत.मुले एकनाथ रामचंद्र आल्हाट,जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रामचंद्र आल्हाट,गुलाब रामचंद्र आल्हाट,काँग्रेस पक्षाचे माजी सेक्रेटरी बाळासाहेब उर्फ लक्ष्मण आल्हाट,तसेच नातु गणेश एकनाथ आल्हाट,अनिकेत अशोक आल्हाट, विक्रांत बाळासाहेब आल्हाट,मयूर गुलाब आल्हाट,सुशांत बाळासाहेब आल्हाट,भाऊ असा मोठा परीवार त्यांच्या मागे आहे.त्यांचा दशक्रिया विधी जुन्नर तालुक्यातील शिरोली ( बुद्रुक) येथे बुधवार रोजी दिनांक 20 /10/2021 रोजी सकाळी 7.30 वा होईल येथे पार पडणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांना आधिन राहून हा दशक्रिया विधी पार पडणार आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जळगाव मध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत उल्हासनगरचे अंकुश गोलतकर . सिल्वर मेडल व ब्रॉंझ मेडल चे ठरले मानकरी दिनांक 1 ऑक्टोंबर ते 3 ऑक्टोंबर रोजी जळगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट या स्पर्धेमध्ये उल्हासनगर येथील दत्तात्रेय व्यायाम शाळा चे अंकुश गोलतकर यांना राज्यस्तरीय स्पर्धेत बेंच प्रेस मध्ये द्वितीय क्रमांक वर सिल्वर मेडल तसेच डेडलिफ्ट मध्ये तृतीय क्रमांकावर ब्राँझ मेडल मिळविला अंकुश गोलतकर यांना सन्मानित करण्यात आल्यामुळे उल्हासनगर मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून दत्तात्रेय व्यायाम शाळा व नमस्कार मंडळ कल्याण. सार्वजनिक गणेश मित्र मंडळ, तरुण मित्र मंडळ कृष्णा नगर व गोवा बॉईज ग्रुप तसेच मानव हित लोकशाही पक्ष तसेच समस्त मित्र मंडळी यांनी अंकुश गोलतकर यांना भरभरून शुभेच्छा दिल्या
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मध्य रेल्वे DRUCC सदस्य- *सुभाष साळुंके* यांनी रेल्वे अधिकारी व अंबरनाथ न. पा. अधिकारी यांच्या समवेत अंबरनाथ *रेल्वे स्टेशन परिसर व बी कॅबिंन नाल्याची केली संयुक्त पाहणी*.......!— खासदार *डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेनुसार ,आमदार डॉ. बालाजी किणीकर* यांच्या सहकार्याने *अंबरनाथ स्टेशन परिसर,रेल्वे स्थानकात प्रवेश करताना होणारी अडचण, पादचारी पुलावरील लाद्यांची दुरूस्ती, बी कॅबींन नाला सफाई व बांधणी, संरक्षक भिंत, पाण्याचा निचरा होण्यासाठी चार जून्या अरुंद कल्व्हर्टची नवीन बांधणी तसेच मोरीवली ते निसर्ग ग्रीन चा प्रस्तावित ROB* इ. बाबत अंबरनाथ स्टेशन प्रबंधक श्री. जॉय इब्राहम यांच्या दालनात *बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर स्थानक परिसर व बी कॅबिन नाला परिसराची संयुक्त स्थळ पाहणी केली.*सकारात्मक चर्चा व निर्णय :*1. *रेल्वे स्थानकात सोयीस्कर व प्रशस्त प्रवेश करता यावा याकरिता रिक्षास्टँड कडील मार्ग मोठा करून जुने रॅलिंग हटविणे, त्यामुळे Entey & Exist प्रवाशांसाठी उपयुक्त होईल.*2. पादचारी पुलाची आठवडा भरात दुरूस्ती करणे.3.RPF व अन्प कर्मचारी यांनी फेरीवाला मुक्त स्टेशन परिसर करण्यासाठी संयुक्त कारवाई करणे.4. बी कॅबिन नाल्याची खोली वाढविणे, बांधकाम करणे याकरीता रेल्वेने NOC देणे तसेच डिटेल्स प्लॅन बनविणे. यामुळे पावसाळ्यात राहुलनगर, बी कॅबीन परीसरात पूरग्रस्त परिस्थिती टाळता येईल.5. मोरिवली पाडा, नवरेनगर, बी केबिन कडून येणारे सांडपाणी तसेच पावसाळी पाणी वाहून जाणारे 4 अरूंद, काही बंद झालेले कल्व्हर्ट रुंद करणे, जेणेकरून चोकअप न होता पाण्याचा निचरा सहज होऊन रेल्वे रुळावर पाणी साचणार नाही. यावर त्वरीत कारवाई करण्यात आली.6. बी कॅबीन रस्ता- रेल्वे हद्द यामधील रुंदीचा प्रलंबित वाद मिटविणे, याकरीता दोन्ही बाजूचे वास्तुविशारदची जॉईंट मीटिंग करणे,असे ठरले,7.अपूर्ण रेटेनिंग वॉल चे बांधकाम पूर्ण करणे.यावेळी रेल्वे अधिकारी श्री. दिपक सिंग, ट्रॅक अभियंता श्री. यादव, स्टेशन प्रबंधक श्री.जॉय अब्राहम,RPF इन्चार्ज अरविंद कुमार, अंबरनाथ नगर परिषदेचे उपमुख्यधिकरी संदिप कांबळे, आरोग्य अधिकारी श्री. सुरेश पाटील, शाखा अभियंता श्री. राजेश तडवी, आरोग्य निरीक्षक श्री.विलास भोपी व नितीन सावंत तसेच गोपी नायर, बाळा राऊत, राजकुमार जमखंडिकर, गणेश गायकवाड, बळीराम पालांडे, दिपक विशे उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांच्या भाजपात प्रवेश. .राष्ट्रवादी काँग्रेसचे उल्हासनगर महासचिव असलेल्या अमित वाधवा भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी मनीश हिंगोराणी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उल्हासनगर महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळेस भाषण करताना आमदार रवींद्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासाचे तसेच गोरगरीब नागरिकांसाठी सुरु केलेल्या योजनेची माहिती दिली तसेच बेळगाव महानगरपालिकेत आलेल्या भाजपच्या बहुमतासंबधी सांगताना चव्हाण यांनी सांगितले की, देशात सर्वाधिक खासदार भाजपाचे आहेत त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आमदार नगरसेवक महापौर जिल्हा परिषद सदस्य हे सर्वाधिक असल्याचे सांगितले तसेच येत्या उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपा एक हाती सत्ता मिळणार असल्याचे समर्थ वाटचाल करीत असल्याचे सांगितले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स