उल्हास नदीत दुसऱ्या दिवशी सुद्धा जलपर्णी दर्शन...मोहना बंधारा पाणी उपसा केंद्र येथे मोठ्या प्रमाणात अडकत आहे जलपर्णी
उल्हास नदीत दुसऱ्या दिवशी सुद्धा जलपर्णी दर्शन... मोहना बंधारा पाणी उपसा केंद्र येथे मोठ्या प्रमाणात जलपर्णी अडकत आहे दिनांक 24 जून 2022 ठाणे जिल्ह्यातील 50 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना पाणी पुरवठा करणारी उल्हास नदी ही मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊ लागली आहे. कारखान्यांतून सोडले जाणारे रसायनमिश्रीत सांडपाणी आणि नदीत वेगाने वाढत असलेली जलपर्णी या दोन्हीमुळे जलचरांचे अस्तित्व संकटात सापडले आहे. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण तसेच ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरातील गावांचे सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे उल्हास नदीचे अनेक ठिकाणी नाल्यात रूपांतर झाले आहे. काही वर्षांपासून नदीपात्रात जलपर्णी फोफावत आहे. गेल्या वर्षी केलेल्या उपाययोजना मुळे बऱ्याच प्रमाणात ह्यावर्षी कमी झालेली दिसून येत होती, परंतु आज अचानक रीजेंसी एंटीलिया ते मोहना एनआरसी बंधारे पर्यंत ही अवाढव्य जलपर्णी दिसून आली, उल्हास नदीत दुसऱ्या दिवशी सुद्धा 24 जुन रोजी वाहत येणाऱ्या जलपर्णीचे दर्शन झाले, मोहना बंधारा पाणी उपसा केंद्र येथे मोठ्या प्रमाणात अडकत आ