जनहित लोकशाही पार्टीचे अध्यक्ष मा.अशोकराव आल्हाट, नागपूर चा विशेष दौरा करून मुंबईत परतले
जनहित लोकशाही पार्टीचे अध्यक्ष मा.अशोकराव आल्हाट, नागपूर चा विशेष दौरा करून मुंबईत परतलेया दौऱ्यामधे त्यांनी महाराष्ट्रातील विविध पक्ष व सामाजिक संघटना चे प्रमुख यांना भेट देवून त्यांच्या सोबत अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली. ज्या ज्या मान्यवरांना भेटी दिल्या त्या सर्वांनी नव्याने निर्माण केलेल्या लोकशाही आघाडी, मधे
जाहीर प्रवेश करणार असल्याचे सांगितले असून
नागपूर शहरातील अनेक संघटना व पक्ष प्रमुखांची या वेळी बैठक संपन्न झाली, या वेळी,मा,खा, हरिभाऊ राठोड मा आमदार उपेंद्र शेंडे,खोरिपा, मा, आनंदा ओहळ, तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बैठकी पार पडल्या
जनहित लोकशाही पार्टी चे, विदर्भ अध्यक्ष,मा साहेबराव साबळे पाटील,हे विशेष उपस्थित होते. त्यांनी मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणी लोकशाही आघाडी च्या माध्यमातून अनेक कार्यक्रम चालू केले आहेत
लोकशाही आघाडी ची विजयी घोडदौड आता कोणीही रोखू शकत नाही, असे अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यात बैठका सत्र सुरू झाले आहे.
जनहित लोकशाही पार्टी चे महाराष्ट्र अध्यक्ष मा, रामराव महाराज भाटेगावकर नांदेड, यांच्या सोबत अनेक संघटना व पक्ष प्रमुखांची चर्चा झाली असून लवकरच ते संपुर्ण मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात बैठका घेणार आहेत.आघाडी च्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत
जनहित लोकशाही पार्टी चे संस्थापक अध्यक्ष मा अशोकराव आल्हाट हे मुंबई मध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भेटून लोकशाही आघाडी मजबूत करण्यासाठी जोरदार काम करत असतात सध्या
नागपूर , अमरावती, यवतमाळ,असा प्रचंड मोठा विभाग काबीज करून, अशोकराव आल्हाट हे मुंबईत, परतले आहेत
या वेळी त्यांच्या सोबत पन्नास वर्षे शोशलमूमेन्ट,चे काम करणारे, विचारवंत,लेखक , साहित्यिक, आंबेडकरी चळवळीतील नेते,मा आनंदजी ओव्हाळ होते,
हा दौरा यशस्वी करण्यासाठी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व नेते व प्रेम करणारे असंख्य चाहते, यांनी विशेष परिश्रम घेतले या बद्दल अशोकराव आल्हाट यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले
__________________________________________
संपादक हरी आल्हाट 9960504729
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद