राजीनामाच दिला नसता तर...?
मुंबईः शिवसेनेवर नाराज झालेल्या आमदारांचा गट दुरावला. भाजप काही काळातच सरकार स्थापन करणार अशी हातघाईची स्थिती पाहून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यामुळे भाजपने पुढे होत नवं सरकार स्थापनेचा प्रस्ताव दिला आणि नंतर भाजप तसेच एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या संगनमताने महाराष्ट्रात नवं सरकार आलं. त्यापूर्वी शिवसेनेने आमदारांविरोधात केलेली अपात्रतेची कारवाई, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वासाचा ठराव, आदी कायदेशीर पेचही घाई-घाईनेच निर्माण झाले. पण हायपोथेटिकल परिस्थितीचा काल्पनिक परिस्थिती विचारात घेतली आणि उद्धव ठाकरेंनी राजीनामाच दिला नसता तर आत्ता महाराष्ट्रात जो सर्वात मोठा कायदेशीर पेच निर्माण झालाय, तो उद्भवलाच नसता. किंबहुना जी काही अस्थिरता निर्माण झाली असती, त्यातील काही पत्ते तरी उद्धव ठाकरेंच्या हातात मजबूत राहिले असते, असं बोललं जातंय. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही अशीच काही प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टात आज उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील शिवसेनेच्या परस्पर विरोधी अशा चार याचिकांवर सुनावणी झाली. कोर्टाने दोन्ही बाजूंच्या