पोस्ट्स

नथुराम गोडसे’ नाटकाच्या नावात नवीन काही जोडू नका शरद पोंक्षेंना हायकोर्टाचे निर्देश

इमेज
नथुराम गोडसे’ नाटकाच्या नावात नवीन काही जोडू नका शरद पोंक्षेंना हायकोर्टाचे निर्देश  मुंबई प्रतिनीधी  :  अभिनेते शरद पोंक्षे यांनी रंगभूमीवर आणलेल्या नव्या नाटकाच्या नावात 'नथुराम गोडसे बोलतोय' ऐवजी 'नथुराम गोडसे' असा बदल केल्याची माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला दिली. त्यावर 'नथुराम गोडसे' या नव्या नावात यापुढे नवीन काही जोडू नका, असे निर्देश न्यायमूर्ती रियाझ छागला यांनी शरद पोंक्षे यांना दिले. या प्रकरणी 30 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. माऊली भगवती प्रॉडक्शन्सच्या नव्या नाटकातील संहिता, सादरीकरण व ट्रेडमार्कचे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या मूळ नाटकाशी साधर्म्य असल्याने आमच्या व्यावसायिक हक्कांचे उल्लंघन होत आहे, असा आरोप करीत ‘माऊली प्रॉडक्शन्स’चे मालक व निर्मा ते उदय धुरत यांनी माऊली भगवती प्रॉडक्शन्सचे मालक प्रमोद धुरत व अभिनेते शरद पोंक्षे यांच्या विरूद्ध दावा दाखल केला आहे. या प्रकरणी बुधवारी न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या पुढे सुनावणी झाली. मागील सुनावणी वेळी नव्या नाटकाच्या नावात बदल करण्याची तयारी पोंक्षे यांनी दर्शवल

उल्हासनगर ही कलाकारांची खाण आहे

इमेज
कलाकारांच्या भेटीला जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर ही कलाकारांची खाण आहे उल्हासनगर ही कलाकारांची खाण आहे असे म्हटले जाते आणि जनहित न्यूज महाराष्ट्र नेहमीच या खाणीतून हिरे शोधत असतात ही शोध पत्रकारिता करत असताना नीता कराओके स्टुडिओ गुरुनानक रोड जवळ त्रिवेणी नगर विशाखा स्कूल, उल्हासनगर 4 येथे निता इंगळे यांची भेट झाली असता माहिती मिळाली की निता इंगळे यानी नीता कराओके स्टुडिओ द्वारा कलाकारांना गायन करण्यासाठी चांगली संधी दीली आहे नीता इंगळे व त्यांची टीम यांच्यासोबत कलाकारांची व्यथा व व्यासपीठ यावर जनहित न्यूज महाराष्ट्र ची चर्चा झाली या प्रदीर्घ चर्चेमध्ये जनहित न्यूज महाराष्ट्र नेहमीच कलाकारांच्या बाजूने ठाम उभे राहील असे वचन देण्यात आले व कलाकारांच्या मनमोहक गीतांनी कार्यक्रमाचा आरंभ झाला... ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

चिखलोली धरणातून अंबरनाथ पूर्व भागात होणारा पाणी पुरवठा सुरळीत सुरू करावा, तातडीने पावले उचलावी

इमेज
चिखलोली धरणातून अंबरनाथ पूर्व भागात होणारा पाणी पुरवठा सुरळीत सुरू करावा, तातडीने पावले उचलावी  अंबरनाथ   प्रतिनिधी , नवरेनगर मधिल पाण्याची टाकी कमी वेळात पूर्ण क्षमतेने भरण्याकरिता चिखलोली जवळील लिकेज काढणे,7-8 फूट जमीनीखालील पाण्याची लाइन काढणे ऐवजी त्याठिकाणी ड्रॉप होणारा पाणी दाब पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ठिकाणी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम त्वरित हाती घेणे गरजेचे आहे, असे म.जी.प्रा. चे कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांना भर रस्त्यात निकक्षून सांगितले. याबाबत अधिक्षक अभियंता तन्मय कांबळे व मुख्य अभियंता भामरे यांच्याशी फोनद्वारे सकारात्मक चर्चा केली. यावेळी शअधिकाऱ्यांना ठाण्याला बोलावून घेतले.याअगोदर माझ्या संवाद जनसंपर्क कार्यालयात वडवली विभागातील पाणीग्रस्त नागरिकांसोबत उपअभियंता बसंगर, शाखा अभियंता शेकोकारे यांच्या सोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभावी उपाययोजना करणे, पाणीपुरवठा तातडीने करणारी मुख्य लाईन टाकणं याकरीता कार्यकारी अभियंता देशपांडे यांना भेटण्याचे ठरल्यानुसार त्यांना एमआयडीसी पाईपलाईन रस्त्या लगत भेट घेतली,  उपाययोजना करणेबाबत सव

‘व्हॉइस ऑफ मीडिया’ अधिवेशनाच्या लोगोचे प्रकाशन

इमेज
‘व्हॉइस ऑफ मीडिया’  अधिवेशनाच्या लोगोचे प्रकाशन ! ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांची उपस्थिती   मुंबई ता. ३ : देशभरातील क्रमांक एकची संघटना असलेल्या  ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन येत्या 18 व 19 नोव्हेंबरला बारामती येथील गदिमा सभागृहात पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या हस्ते कृषी मंत्री दादा भुसे, मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत या अधिवेशनाच्या लोगोचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, मंत्री शंभूराजे देसाई व संघटनेच्या राज्य कार्यवाहक  यास्मिन शेख प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील लोगोचे प्रकाशन केले. बारामती येथे होणाऱ्या या अधिवेशनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची या अधिवेशनाला उपस्थिती राहून मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या अधिवेशनाला काँग्रेसचे प्रदे

भीमालया आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड कंपनी च्या प्रॉडक्ट चे लोकार्पण.

इमेज
भीमालया आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड कंपनी च्या प्रॉडक्ट चे लोकार्पण. लातूर प्रतिनिधि:   भारतातील अनेक मान्यवराचे गुरु  कालिदास महाराज हरियाना यांच्या हस्ते आयुर्वेदिक क्षेत्रात नव्यानेच सुरुवात केलेली भिमालया आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या आयुर्वेद उत्पादनाचे लोकार्पण,पंढरपुर मधिल विट्ठल रुक्मिणी मंदिराचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज, एमएसआरडीसी चे सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार बळीराम गायकवाड, लातूर लोकसभेचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड, खा.सुधाकर शृंगारे, भदंत डॉ उपगुप्त महाथेरो आदी मान्यवरांच्या हस्ते भीमालयाच्या प्रॉडक्ट चा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्य आयुर्वेदिक औषधाच्या भीमालया आयुर्वेद कंपनी सुरू करण्यात आली आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानी प्रमाणित केलेले सर्व प्रोडक्ट आहेत. प्रामुख्याने भिमालया मेमरी बुश्टर सिरप,भिमालया शुगर गो सिरप,भिमालया कफ सिरप,भिमालया हेयर ऑइल,भिमालया स्टोनो सिरप,भीमालया चरम सुख कॅप्सुल,भिमालया इम्युनिटी बुष्टर,भिमालया गैस चूर्ण,भिमालया निम बाथ सोप,