भीमालया आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड कंपनी च्या प्रॉडक्ट चे लोकार्पण.

भीमालया आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड कंपनी च्या प्रॉडक्ट चे लोकार्पण.
लातूर प्रतिनिधि: 
भारतातील अनेक मान्यवराचे गुरु  कालिदास महाराज हरियाना यांच्या हस्ते आयुर्वेदिक क्षेत्रात नव्यानेच सुरुवात केलेली भिमालया आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या आयुर्वेद उत्पादनाचे लोकार्पण,पंढरपुर मधिल विट्ठल रुक्मिणी मंदिराचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज, एमएसआरडीसी चे सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार बळीराम गायकवाड, लातूर लोकसभेचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड, खा.सुधाकर शृंगारे, भदंत डॉ उपगुप्त महाथेरो आदी मान्यवरांच्या हस्ते भीमालयाच्या प्रॉडक्ट चा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्य आयुर्वेदिक औषधाच्या भीमालया आयुर्वेद कंपनी सुरू करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानी प्रमाणित केलेले सर्व प्रोडक्ट आहेत.
प्रामुख्याने भिमालया मेमरी बुश्टर सिरप,भिमालया शुगर गो सिरप,भिमालया कफ सिरप,भिमालया हेयर ऑइल,भिमालया स्टोनो सिरप,भीमालया चरम सुख कॅप्सुल,भिमालया इम्युनिटी बुष्टर,भिमालया गैस चूर्ण,भिमालया निम बाथ सोप,असे दहा प्रोडक्ट लाँच केले आहेत.हे सर्व प्रॉडक्ट लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करीत असल्याचे मनोगत डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी केले आहे.
कालिदास महाराज यांनी.       
डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना भिमालया आयुर्वेद कंपनी सुरू केल्याबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. 
या कार्यक्रमाला गहिनीनाथ महाराज,निलंगा पीरपाशा दर्ग्याचे दादा पीर,माजी खासदार रवींद्र गायकवाड,सुधाकर शृंगारे, शैलेश पाटील चाकुरकर, डॉ अर्चनाताई पाटील चाकुरकर,अशोक पाटील निलंगेकर, पंडितराव धुमाळ, डॉ अरुण डावले,विलासराव देशमुख डॉ जोशी, एडवोकेट व्यंकट बेद्रे,सुरेश पवार,भंते पय्यानंद, तसेच अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,अधिकारी, आणि सर्व स्तरातील मान्यवर हजारोच्या संख्येंनी उपस्थित होते.अशी माहीती बहुजन संग्राम या संघटनेचे अध्यक्ष व व्रूत्तदर्शन मिडीयाचे संपादक भीमराव चिलगावकर यांनी दिली आहे.
बातमी जनहित/ जनहित न्यूज महाराष्ट्र 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार