‘व्हॉइस ऑफ मीडिया’ अधिवेशनाच्या लोगोचे प्रकाशन

‘व्हॉइस ऑफ मीडिया’
 अधिवेशनाच्या लोगोचे प्रकाशन !
ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांची उपस्थिती
 
मुंबई ता. ३ : देशभरातील क्रमांक एकची संघटना असलेल्या  ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन येत्या 18 व 19 नोव्हेंबरला बारामती येथील गदिमा सभागृहात पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या हस्ते कृषी मंत्री दादा भुसे, मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत या अधिवेशनाच्या लोगोचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, मंत्री शंभूराजे देसाई व संघटनेच्या राज्य कार्यवाहक  यास्मिन शेख प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील लोगोचे प्रकाशन केले.
बारामती येथे होणाऱ्या या अधिवेशनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची या अधिवेशनाला उपस्थिती राहून मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या अधिवेशनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण यांची देखील उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे. 
अधिवेशनाची वेगाने तयारी होत असून अधिवेशनाला येणाऱ्या पत्रकारांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
---
संघटनेची कामगिरी कौतुकास्पद : मुख्यमंत्री
जेमतेम तीन वर्षाच्या काळात संघटनेने पत्रकारांसाठी व त्यांच्या समस्या निवारण्यासाठी केलेले नियोजन महत्त्वपूर्ण असून शासन दरबारी पाठपुरावा देखील वेगाने होत आहे. या अधिवेशनातून राज्यभरातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेता येतील व त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
------
तळमळ महत्वाची : शरद पवार

मोजकेच पत्रकार वगळता राज्यातील हजारो पत्रकार बांधवांना अनेक समस्या, अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून होत असलेले प्रयत्न व विशेष म्हणजे पत्रकारांबद्दलची तळमळ ही महत्त्वाची बाब आहे. अधिवेशनातून त्यांच्या समस्यांना निश्चितच वाचा फुटेल. आमच्यासारख्या नेत्यांनाही एकाच वेळी हजारो पत्रकारांना भेटता येईल याचा आनंद आहे.
-------
अधिवेशनाचे फलित 
होईल :  अजित दादा 

एवढ्या मोठ्या संख्येने राज्यभरातून पत्रकार बारामतीत येणार ही आनंदाची बाब आहे. सर्व पत्रकारांचे स्वागत आहे त्यांच्या समस्या मार्गी लागण्यासाठी अधिवेशनातून एकजुटीने होणारे प्रयत्न निश्चितच फलदायी ठरतील.
…….

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार