सीबीआयचे देशभरात १० ठिकाणी छापे, कल्याणमधून एकाला अटक
सीबीआयचे देशभरात १० ठिकाणी छापे, कल्याणमधून एकाला अटक मुंबई :केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ऑपरेशन चक्र अंतर्गत सायबर आर्थिक गुन्ह्यांविरोधात देशभर मोहीम चालवली असून त्याअंतर्गत मुंबईसह देशभरात १० ठिकाणी छापे टाकले. त्यात कल्याण येथील कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली. सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सीबीआय ऑपरेशन चक्र अंतर्गत कारवाई करत आहे. सीबीआयने याप्रकरणी दिल्ली, हिसार, लखनऊ, मुंबई, पुणे आणि नाशिक येथील एकूण १० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. तपासादरम्यान कल्याण येथील एका आरोपीस अटक करण्यात आली असल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली. तो कल्याण येथील रहिवासी आहे. सायबर आर्थिक फसवणुकीत तो सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. त्याची चौकशी करणे आवश्यक असल्यामुळे त्याला याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींना बेकायदा सिमकार्ड व बनावट कागदपत्...