सहेली' संस्थेचा पुढाकार: ३० गरजू महिलांना शिलाई मशीन व प्रमाणपत्रांचे वाटप*
* सहेली' संस्थेचा पुढाकार: ३० गरजू महिलांना शिलाई मशीन व प्रमाणपत्रांचे वाटप* * प्रकल्प 'हुन्नर' अंतर्गत महिलांना स्वावलंबनाचे धडे; आतापर्यंत १३२ महिला झाल्या सक्षम* * प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट* उल्हासनगर: वंचित आणि शोषित घटकातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 'सहेली' संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'प्रकल्प हुन्नर' अंतर्गत ३० गरजू महिलांना शिलाई मशीन आणि शिवणकाम किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये एकल महिला, परित्यागता, विधवा, घरेलू कामगार आणि हात मजुरी करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. या प्रशिक्षणाद्वारे महिलांमध्ये स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करण्याइतपत आत्मविश्वास निर्माण झाला आहे. सहेली संस्थेच्या वतीने या महिलांना गेल्या चार महिन्यांपासून शिवणकामाचे 'बेसिक' पासून 'अॅडव्हान्स' पर्यंतचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सर्व ३० महिलांना अधिकृत प्रमाणपत्रे देण्यात आली. या उपक्रमामुळे या महिला आता कोणावरही अवलंबून न राहता स्वाभिमानाने स्वतःचे आण...