सहेली' संस्थेचा पुढाकार: ३० गरजू महिलांना शिलाई मशीन व प्रमाणपत्रांचे वाटप*

*सहेली' संस्थेचा पुढाकार: ३० गरजू महिलांना शिलाई मशीन व प्रमाणपत्रांचे वाटप* 

 *प्रकल्प 'हुन्नर' अंतर्गत महिलांना स्वावलंबनाचे धडे; आतापर्यंत १३२ महिला झाल्या सक्षम* 
 *प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट* 
उल्हासनगर: वंचित आणि शोषित घटकातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 'सहेली' संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'प्रकल्प हुन्नर' अंतर्गत ३० गरजू महिलांना शिलाई मशीन आणि शिवणकाम किटचे वाटप
करण्यात आले. यामध्ये एकल महिला, परित्यागता, विधवा, घरेलू कामगार आणि हात मजुरी करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. या प्रशिक्षणाद्वारे महिलांमध्ये स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करण्याइतपत आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

सहेली संस्थेच्या वतीने या महिलांना गेल्या चार महिन्यांपासून शिवणकामाचे 'बेसिक' पासून 'अ‍ॅडव्हान्स' पर्यंतचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सर्व ३० महिलांना अधिकृत प्रमाणपत्रे देण्यात आली. या उपक्रमामुळे या महिला आता कोणावरही अवलंबून न राहता स्वाभिमानाने स्वतःचे आणि आपल्या पाल्यांचे पालनपोषण करू शकणार आहेत.
मागील तीन वर्षांपासून सहेली संस्था उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील गरजू महिलांचा शोध घेऊन त्यांना प्रशिक्षण देत आहे. सहेली आणि 'एस.डी.सी. संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाला 'डायस्टार' कंपनीचे मोठे सहकार्य लाभले आहे. कंपनीचे संचालक आणि प्रादेशिक उपाध्यक्ष श्री. जयंत खेरा यांच्या मार्गदर्शनाखाली सीएसआर फंडातून दर सहा महिन्यांनी हा उपक्रम राबवला जातो. आतापर्यंत एकूण १३२ महिलांना या प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे.

या कार्यक्रमाला डायस्टार कंपनीचे संचालक श्री. जयंत खेरा, एस.डी.सी. संस्थेचे अध्यक्ष श्री. संदीप सिंग, डायस्टार कंपनीच्या सीनियर सेक्रेटरी श्रीमती कविता चूबे, एस.डी.सी. च्या खजिनदार डॉ. प्रतिमा गोयल, सदस्य विभूती खेडेकर, जयराम घुले तसेच बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती राणी जयप्रकाश बैसाणे उपस्थित होते. सहेली संस्थेचे संचालक श्री. जयप्रकाश बैसाणे यांनी या उपक्रमाचे नियोजन केले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप