बहुजन संग्राम संघटना व वृत्तदर्शन मीडियातर्फे १३५ किलो मिठाई आणि किराणा मालाचे वाटप*

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मुंबईत १३५ कुटुंबांना मदतीचा आधार* 
 *बहुजन संग्राम संघटना व वृत्तदर्शन मीडियातर्फे १३५ किलो मिठाई आणि किराणा मालाचे वाटप* 
 *(प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट )* 
 *मुंबई* : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून 'बहुजन संग्राम' ही सामाजिक संघटना आणि 'वृत्तदर्शन मीडिया' या राज्यस्तरीय वृत्तसंस्थेच्या वतीने मुंबईत अनोखा सेवा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत १३५ किलो मिठाई तसेच १३५ गरजू कुटुंबांना प्रत्येकी १ हजार रुपयांचा शिधा, किराणा आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले.

मुंबई उपनगरातील १३५ दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि बहुजन समाजातील निराधार कुटुंबांना साडी-चोळी व कपड्यांचे वाटप करण्यात आले. बहुजन संग्राम संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष विनोद कांबळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. भीमराव चिलगावकर (प्रदेशाध्यक्ष, बहुजन संग्राम संघटना) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असून, सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
बहुजन संग्राम संघटना आणि वृत्तदर्शन मीडिया गेल्या २१ वर्षांपासून १४ एप्रिल (आंबेडकर जयंती), ६ डिसेंबर (महापरिनिर्वाण दिन) आणि १ जानेवारी (भीमा कोरेगाव शौर्य दिन) यांसारख्या महत्त्वाच्या दिवशी सातत्याने सेवाभावी उपक्रम राबवत आहेत. याही वर्षी ही परंपरा कायम राखत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवण्यात आली.

कोरोनाच्या जागतिक महामारीत प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने महाराष्ट्रभर जवळपास १० हजार कुटुंबांना किराणा वाटप करून मदतीचा हात दिला होता. त्यांच्या या साहसी सेवाकार्याबद्दल त्यांना देशपातळीवरील एक आणि राज्यस्तरीय दोन अशा एकूण तीन 'कोरोना योद्धा' व 'कोरोना किंग' पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

या यशस्वी उपक्रमाची माहिती संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. यामध्ये ठाणे जिल्हा अध्यक्ष सचिन गायकवाड, संघटन सचिव दिलीप थोरात, रमेश कांबळे, मुरलीधर काळे, दिल्ली महिला आघाडी अध्यक्षा यशोदा गौतम, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा अनुराधा चौधरी बिडकीनकर, कार्याध्यक्षा चारुलता सोनवणे, उपाध्यक्षा आशा मिश्रा, बिहार राज्य महिला आघाडी अध्यक्षा निशादेवी सिंग, सचिव अश्विनी साळवे, स्वाती कसबे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप