उल्हासनगरात भाजप-शिवसेनेत जुंपली;

*उल्हासनगरात भाजप-शिवसेनेत जुंपली;* मेट्रोच्या श्रेयावरून सुरू झालेला वाद चिघळला
• आमदार कुमार आयलानींवरील वक्तव्यावरून भाजप आक्रमक
• कमलेश निकमांनी खेद व्यक्त करेपर्यंत असहकाराचा भाजपचा इशारा
 *उल्हासनगर (प्रतिनिधी):* 
मेट्रो प्रकल्पाच्या श्रेयवादातून उल्हासनगरमधील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सुरू झालेली धुसफूस आता उघड असहकाराच्या भूमिकेपर्यंत पोहोचली आहे. भाजपचे स्थानिक आमदार कुमार आयलानी यांच्याविरोधात शिवसेना नेते तथा महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांनी कथित आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. कमलेश निकम यांनी या वक्तव्याबद्दल सार्वजनिकरीत्या खेद व्यक्त करेपर्यंत त्यांच्या कोणत्याही कामाला भाजपची साथ मिळणार नाही, असा थेट इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप रामचंदानी यांनी दिला आहे,

आमदार कुमार आयलानी, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, उपमहापौर अमर लुंड यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. "भाजपचे सर्व ३७ नगरसेवक आमदार आयलानी यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत," असे यावेळी रामचंदानी यांनी स्पष्ट केले.

 *कंत्राटदारांवर दबावाचा भाजपचा गंभीर आरोप* 
यावेळी भाजपने कमलेश निकम यांच्यावर प्रशासकीय कामांत हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप केला. "कंत्राटदारांवर दबाव टाकून स्वतःच्या पसंतीच्या कंत्राटदारांकडून कामे करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा दावा भाजपने केला. याशिवाय उल्हासनगरमधील विकासकामांचे श्रेय लाटणे, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न, जुने टेलिफोन एक्स्चेंज आणि शहरातील तीन महत्त्वाच्या भूखंडांच्या मुद्द्यांवरूनही भाजपने शिवसेनेला घेरले.

 *खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या हस्तक्षेपाची मागणी* 
उल्हासनगरातील महायुतीतील हा वाढता अंतर्गत वाद रोखण्यासाठी महायुतीचे स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ या वादात हस्तक्षेप करावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. कमलेश निकम आणि सभागृह नेते अरुण आशान यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा आणि आमदारांबाबत केलेल्या वक्तव्यावर खेद व्यक्त करावा; त्यानंतरच महायुतीतील सहकार्याचा फेरविचार केला जाईल, असे भाजपने ठामपणे स्पष्ट केले आहे.

भाजपच्या या आक्रमक पवित्र्यामुळे उल्हासनगर महापालिकेतील आणि पक्षांतर्गत महायुतीतील राजकारण तापले असून हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार