जनहित न्यूज महाराष्ट्र. *नामांकित ब्रँडच्या बनावटी जीन्स आणि टीशर्ट बनवणाऱ्या फॅक्टरी वर कॉपीराईट अधिकारी व मुंबई क्राईम ब्रँच चा छापा* कॉपीराईट अधिकारी रामजीत गुप्ता यांना सूत्रांकडून गुप्त बातमी मिळाली होती की मुंबई मालाड पूर्व पठाणवाडी या ठिकाणी नॅशनल व मल्टिनॅशनल कँपनीच्या बनावटी जीन्स व टीशर्ट बनविले जातात. इन्वेस्टिंगेशन टीमने ताबडतोब ही खबर मुंबई क्राईम ब्रँच ला दिली. त्यानंतर रामजीत गुप्ता व त्यांच्या टिमने मिळून मालाड मधील ४ जागांवर दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी छापा टाकला. या छाप्यात लिवाईस,सिके,अरमानी,. ली कूपर .सारख्या अनेक नामांकित कंपन्यांचे जीन्स व टीशर्ट भारी प्रमाणात प्राप्त झाले.. जवळपास तीस लाखापेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनि जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून .पोलिसांच्या सांगण्यानुसार चौकशीअंती अजून काही नकली कारभारी त्यांच्या कैदेत असतील. या कारवाई मध्ये कॉपीराईट अधिकारी रामजीत गुप्ता,. रवी वासवांनी , संतोष नालेकर ,जफर शेख या सर्व टीम च्या अथक प्रयत्नांने ही कार्यवाही ला यश आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार