जनहित सिने नाटय संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी मा. हरी चंदर आल्हाट यांची नियुक्ती तर महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर मा. श्याम भाऊ जांबोलीकर यांची नियुक्ती
दिनांक २१जाने २०२१रोजी जनहित लोकशाही पार्टी चे संस्थापक अध्यक्ष मा. अशोकराव आल्हाट यांच्या वतीने जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक मा. हरी चंदर आल्हाट यांना जनहित लोकशाही पार्टी मध्ये जनहित सिने नाट्य संघटना च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या पदावर नियुक्ती पत्र देवून नियुक्त करण्यात आले तसेच महाराष्ट्र तेज न्यूज चॅनल चे संपादक मा. श्याम भाऊ जांबोलीकर यांना महाराष्ट्र प्रदेश सचिव या पदावर नियुक्ती पत्र देवून नियुक्त करण्यात आले . या वेळी नवं नियुक्त महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरी चंदर आल्हाट तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. श्याम भाऊ जांबोलीकर यांनी महाराष्ट्रातील कलावंत यांना आम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून त्यांचा उदरनिर्वाह चा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू तसेच सध्या सोशल मीडिया च्या माध्यमातून अनेक नवीन कलावंत ( हौशी कलावंत ) लहान सहान लघुपट तयार करीत आहेत. अश्या कलावंतांना सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू. असे जाहीर केले. तसेच जेष्ठ व नवीन कलावंतांनी सुद्धा जनहित सिने नाट्य संघटना मध्ये सहभागी होऊन एकमेका सहाय्य करावे.. असे आवाहन केले. या वेळी . प्रियांत हांडोरे. इस्माईल शेख. हर्षद पठाडे. सोनाली बढे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र. कल्याण
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद