राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त जिजाऊ वंदन करून प्रतिमेचे पूजन

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त जिजाऊ वंदन करून प्रतिमेचे पूजन

 नगरसेवक .सुभाष साळुंके यांच्या संवाद जनसंपर्क कार्यालय येथे
 राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ वंदन करून प्रतिमेचे पूजन केले.


अंबरनाथ येथील कृष्णनगर,शिवाजीनगर, वडारवाडी सोमेश्वर मंदिर परिसरातील घरकाम करणाऱ्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा,

महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या कल्याण येथील कार्यालयात 4थ्या टप्प्यात 259 अर्ज भरून लेबर ऑफीसर च्या उपस्थितीत पडताळणी करून घेतली, त्यांपैकी आज जिजाऊ जयंती निमित्त ५० घरेलू कामगार महिलांना महाराष्ट्र शासन नोंदणी प्रमाणपत्र  वाटप करण्यात आले. 

यापूर्वी नोंदणी केलेल्या 350 घरकाम करणाऱ्या महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम सौ. सुवर्णा साळुंके यांनी 
नगरसेवक 
 सुभाष साळुंके यांच्या सहकार्याने केले.

यावेळी शिवसेना महिला विधानसभा संघटक सौ. मालतीताई पवार, विभाग संघटक सौ. सुषमा रसाळ, संवाद फाऊंडेशन सदस्या सौ. नंदा देशपांडे, आशाताई शेकोकारे, सौ. वैशाली शेलार, सौ.मनिषा मसणे, सौ. सुषमा आचरेकर, सौ.सुनिता रघुनाथन, सौ.सुनिता अरगडे,सौ. राखी पार्टे, उपस्थित होत्या. 

कार्यक्रमाचे आयोजन संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांनी केले होते

ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार