दीन दिव्यांग आधार सेवा यांच्या वतीने जागतिक पत्रकार दिन उल्हासनगर कार्यालयात साजरा करण्यात आला

दीन दिव्यांग आधार सेवा यांच्या वतीने जागतिक पत्रकार दिन उल्हासनगर कार्यालयात साजरा करण्यात आला

दि. 06/01/2022 रोजी जागतिक पत्रकार 
दिन दिव्यांग आधार सेवा संस्थेच्या कार्यालयांमध्ये साजरा करण्यात आला 

सदर कार्यक्रमा प्रसंगी उल्हासनगर शहरांमधील नामवंत पत्रकार .किरण तेलगोटे, महाराष्ट्र न्यूज चैनल, सुनील तांबे, क्राईम रिपोर्टर सलीम मंसूरी. जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरि चंदर आल्हाट  दैनिक अंबरनाथ टाइम्सचे अशोक शिरसाठ,
 तसेच दिव्यांग आधार सेवा संस्थेचे अध्यक्ष सचिन सावंत
 व त्यांचे सहकारी 
बी. आर. पाटील.सौ. छाया सचिन सावंत, 
संतोष गरुड, विकास कांबळे, भोला बोरगावकर, संतोष गोडांबे, कु. संतोष कांबळे 
तसेच अनेक  लोकांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय पत्रकारांना संस्थेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले
 व मान्यवरांना पुष्पगुच्छ देण्यात व त्यांचा सन्मान करण्यात आला

या वेळी जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट यानी आपले विचार मांडले

पत्रकार अशोक शिरसाठ यांनी सुद्धा आपले विचार मांडले

तसेच किरण तेलगोटे यांनी आपल्या विचारातून दीव्यांग बांधव यांचे मनोबल वाढवले

मान्यवरांनी सदर प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षांचे व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी आर पाटील यांनी केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप