नगरसेवक– सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नातून रायगड चौकाचे सुशोभिकरण कामाचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
नगरसेवक– सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नातून रायगड चौकाचे सुशोभिकरण कामाचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या उपस्थितीत भूमिपूजन*.........
प्रभाग क्र.४४ मधील रायगड बिल्डिंग समोरील चौकाचे सुशोभिकरण स्वच्छ वॉर्ड स्पर्धा प्रथम क्रमांक विजेते अनुदानातून करण्याबाबत विषयासह निविदा मंजूर करण्यात आली होती. कोविड महामारीमुळे तसेच चौकातील अतिक्रमनास मिळत असलेल्या काही राजकीय पाठिंब्यामुळे सदर जागा खाली करण्यास न.पा.स विलंब झाला, यामुळे कामास मुदत वाढ तसेच सदर चौकाचे योग्य व परिसराला साजेसे सुशोभीकरण व्हावे, याकरीता वाढीव तरतूद यावी, यासाठी न.पा मुख्याधिकारी/ प्रशासक डॉ.प्रशांत रसाळ यांच्याशी यशस्वी चर्चा केली.
पंढरीचे वारकरी व स्वराज्याचे धारकरी यांचा संगम साधणारे "रायगड चौकाचे सुशोभिकरण भूमिपूजन"
रविवार,१७/४/२०२२ रोजी
आमदार_डॉ_बालाजी_किणीकरयांच्या उपस्थितीत ज्येष्ठ_नागरीक त्रिंबक धर्माधिकारी. यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी
नगरसेवक सुभाष_साळुंके यांनी आपला प्रभाग स्वच्छ,सुंदर करण्या सोबतच सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यासाठी प्रंचड परिश्रम करून सर्वांत जास्त शासकीय निधी मंजूर घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे, आताही ताडवाडी परीसर, वडवली विभागातील योगायोग,सुलभ, सोसायटी, चंद्रात्रे क्लासेस समोरील रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी नगर विकास मंत्री एकनाथजी_शिंदे यांच्या कडून निधी_मंजूर घेण्यात यशस्वी ठरले आहेत. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने कार्यसम्राट_नगरसेवक ठरले आहेत.आपल्या प्रभगासोबतच आजूबाजूचा विभाग तसेच अंबरनाथ शहरातील महत्वाचे विकास कामे होण्यासाठी सुभाष साळुंके .प्रयत्नशील असतात. यावेळी सुभाष साळुंके व संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांचे आमदार डॉ. किणीकर यांनी कौतुक करून सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या रायगड चौकाचे योग्य सुशोभिकरणसाठी अधिक निधी देण्याचे जाहीर केले.
यावेळी अल्पावधित केलेल्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुभाष_साळुंके यांनी प्रभाग विभागातील विकासकामे करण्यासाठी केलेल्या अथक पाठपुरावा व प्रयत्नांना शिवसेना नेते, नगरविकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे , खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे ,आमदार डॉ. बालाजी किणीकर व न. पा. प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले, याबद्दल आभार मानून कृज्ञता_व्यक्त केली. प्रभागात होत असलेल्या कामाचे तसेच मंजूर झालेल्या विकासकामे इ. बाबत माहिती दिली.
याप्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख गणेश कोतेकर, रमेश निकम, राजनराव देसले, विठ्ठल खर्चे, मधुकर बोरले, नारायण निकम, बळीराम पालांडे, दिपक विशे, विजय देबणात, विलास शेट्ये, रामदास ठोंबरे, फाळके मामा, निजामभाई पिर्जादे, निलेश आपटे, राजकुमार जमखंडीकर, लिलाधर लाड, वामन सर, गोविंद शेडगे, संजीव खांडेकर,भाऊ केंगरे, गोविंद पाटील, गिरीश चौधरी, विजय करावडे, संदिप हरवंदे, प्रफुल इंगले, राजूशेठ, नारायण जाधव, समीर दुधाणे, सुमित बनसोडे,सुनिल देशपांडे,सौ.नंदा देशपांडे, सुनंदा मांढरे, आशाताई शेकोकारे, मथुरे मॅडम, वनिता लाड, सुनिता रघुनाथन, सौ. सुवर्णा साळुंके, मानसी साळुंके, जयश्री वाघेला, पुष्पा सिंह, सौ. खरावडे, सौ.महाले, योगिता पळसकर,शशांक व बालाजी बिल्डिंग मधील नागरीक इ. उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद