स्वर वंदना

श्री गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधी व इव्हेंट एनीथिंग अँड एवरीथिंग च्या सहकार्याने
कै. पं. रामदास कामत, कीती शिलेदार, आशालता वाबगावकर या दिग्गजांना        *सांगीतिक  मानवंदना*
*श्री गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधी निर्मित व इव्हेंट एनीथिंग अँड एवरीथिंग* च्या सहकार्याने दिवंगत पं रामदास कामत ,आशालता वाबगावकर , *किर्ती* शिलेदार यां संगीत नाट्य  क्षेत्रातील दिग्गजांना सांगीतिक मानवंदना देण्याचा कार्यक्रम *शनिवार* दिनांक 21 मे रोजी सायंकाळी चार वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथील पु ल *देशपांडे* अकादमीच्या तिसऱ्या मजल्यावरील थिएटर मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे .
या कार्यक्रमात या तीनही दिग्गजांनी गायलेल्या नाट्य *गीतांचे*  सादरीकरण होणार आहे .या कार्यक्रमाची संकल्पना रवींद्र ढवळे, सुभाष सराफ यांची असून मानसी फडके- केळकर, नुपूर गाडगिळ,  धनंजय म्हसकर, निनाद जाधव हे कलाकार ही गीते सादर करणार आहेत .त्यांना संगीत साथ राजेंद्र भावे ,सुहास चितळे ,ओमकार अग्निहोत्री यांची असून *तांत्रिक* साहाय्य  राकेश जोशी, विश्वास महाशब्दे, मोहित भेंडे करणार आहेत. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुभाष सराफ आहेत. सर्वांसाठी विनामुल्य असणार्‍या या कार्यक्रमास  प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आहे. अशी माहिती प्रसिद्धी समन्वयक शीतल करदेकर यांनी दिली!
प्रतिनिधी गणेश तळेकर मुंबई
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार