नालेसफाई कराअन्यथा आंदोलन करू उल्हासनगर महानगर पालिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदीप गोडसे यांनी दिला निवेदन पत्राद्वारे इशारा

नालेसफाई करा
अन्यथा आंदोलन करू उल्हासनगर महानगर पालिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
 प्रदीप गोडसे यांनी दिला निवेदन पत्राद्वारे इशारा
उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र.१३ लालचक्की, अंबिका, संभाजी चौक व सुभाष टेकडी या संपूर्ण विभागात नालेसफाई अद्याप सुरू झालेली नाही.
सदरची नाले सफाई त्वरित करावीत !
अन्यथा आंदोलन केले जाईल.
 मनसेचा इशारा
नालेसफाई होऊनही परंतु व्यवस्थित साफ न केल्याने प्रभाग क्र.१३ मध्ये विशेषतः ज्योती कॉलोनी, श्री कृष्ण कॉलनी, पाचपांडव कॉलनी या भागात दरवर्षी नाल्याचे पाणी पावसाळ्यात आजूबाजूच्या घरात शिरत आहेत आणि आता तर नालेसफाई अद्याप जराही झालेली नाहीत त्यात पावसाळा जवळ आलेला आहे. नालेसफाई झाली नाही तर पुढची परिस्थिती अत्यंत भयानक असेल. ज्यात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल.
त्यानुषंगाने संपूर्ण प्रभाग क्र.१३ मधील मोठे व छोटे नाल्यांची नालेसफाई चांगल्या दर्जाची व्हावी ही मागणी 27.05.2022 रोजी मनसेच्या वतीने महापालिका आयुक्तांस करण्यात आलेली आहे.
        ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
__________________________________________बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी आल्हाट ९९६०५०४७२९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन