रूप नगर के चीते’ चित्रपटाची पहिली झलक भेटीला

*‘रूप नगर के चीते’ चित्रपटाची पहिली झलक भेटीला*
प्रत्येक नात्याचा एक राखीव कोपरा असतो. यात एक ख़ास कोपरा मैत्रीचाही असतो. आपल्या सुख दु:खात सदैव आपल्या सोबत असणारी व्यक्ती म्हणजे मित्र... आयुष्याच्या चढ उतारात मन हलकं करायला मैत्रीचं नातं हवं असतं. म्हणून आपल्याभोवती मैत्रीचा दरवळ असेपर्यंतच,  आपल्या मनातल्या मैत्रीच्या या कोपऱ्याचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे त्यांना व्यक्त करून सांगणं गरजेचं असतं. हाच आशय 'रूप नगर के चीते' या आगामी मराठी चित्रपटातून अधोरेखित दोन मित्रांच्या अनोख्या मैत्रीची कथा असलेल्या 'रूप नगर के चीते' या चित्रपटाचं आकर्षक पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून 
१६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
एकमेकांच्या खांद्यावर आत्मविश्वासाने हात टाकून, आपल्याच मस्तीत चाललेले दोन तरुण मित्र या पोस्टरमध्ये दिसत आहेत. चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाची चर्चा होती त्यामुळे या चित्रपटात कोण असणार? याचे तर्क-वितर्क लावले जात होते. आता याचा खुलासा झाला असून करण किशोर परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा अभिनेते या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. मैत्रीला प्रेमाचा, आपुलकीचा, मस्तीचा आणि हक्काचा असा वेगवेगळा रंग असतो. या सगळ्या रंगाचं अद्भुत इंद्रधनुष्य 'रूप नगर के चीते' या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे.
प्रतिनिधी गणेश तळेकर जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729
__________________________________________महत्वाची सूचना:  जनहित न्यूज महाराष्ट्र सोबत आता आपल्या बातम्या साप्ताहिक बातमी जनहित या पेपर मध्ये सुद्धा प्रकाशित होणारं कृपया सहकार्य असावे 
संपादक हरी चंदर आल्हाट ९९६०५०४७२९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप