माजी सैनिक योध्दा तानाजी ज्ञानदेव पवार यांचा जनहित न्यूज महाराष्ट्र चैनलच्यावतीने सत्कार सोहळा संपन्न

माजी सैनिक योध्दा 
तानाजी ज्ञानदेव पवार यांचा जनहित न्यूज महाराष्ट्र चैनलच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न 
उल्हासनगर २८ जुलै २०२२
उल्हासनगर शहरातील  राहणारे  योध्दा  तानाजी ज्ञानदेव पवार यांनी १९९०  पासून २००१ पर्यंत सैन्य दलात पॅराशुट रेजिमेंट २ स्पेशल फोर्स कमांडो म्हणून देशाची सेवा केली असून  जम्मू काश्मीर या  ठिकाणी युद्धामध्ये ब्लास्ट झाल्यामुळे त्यांना अपंगत्व आले  मात्र  त्यांचे धैर्य आणि धाडस खचले नाही सध्या तानाजी ज्ञानदेव पवार हे माजी सैनिक  हे  उल्हासनगर या ठिकाणी आपल्या परिवारासोबत राहत आहे  म्हणून त्याच्या सत्कार  सोहळा हा  दि.  २८  जुलै २०२२ रोजी उल्हासनगर - ५ मध्ये तहसिदार कार्यालय जवळ   जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल च्या वतीने संपादक हरी चंदर आल्हाट. यांच्या हस्ते तानाजी पवार यांचा सन्मान आणि  सत्कार करण्यात आला 
 या सत्कार सोहळा  प्रसंगी नायब तहसीलदार गणपत शिंगाडे, उल्हासनगर  सेतू विभागाचे  सहदेव सूर्यवंशी, राजेंद्र सानप  दैनिक सम्राट चे उपसंपादक  रविद्र धांडे, पत्रकार  अशोक  एफ शिरसाट,  हर्षद पठाडे, आबासाहेब साठे,समाजसेवक केशव लोणारे, यतीन मोरे, तसेच रवी पवार, किशोर आल्हाट, नितीन राजोरीया, अशोक छोकर, प्रवीण नाईकवाडे, मीनल निकाळजे, स्टॅनली रोंदिया प्रियवंदा गांगन,महिला समाज सेविका अलका जगताप, रेखा शेलार , सुनिल साळुंके, पवार ,  यांच्यासह  समाज सेविका आदी  मान्यवर  यावेळी उपस्थित होते
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन