पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठकी चे आयोजन
पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठकी चे आयोजन
पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तसेच या बैठकीत अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यावेळी उपस्थित होते तसेच या बैठकीत चर्चा करण्यात आली
प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा
ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी
पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना
राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी
यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती
कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसांना शासकीय सेवेत समाविष्ट व मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत
पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण
राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता
यासह पत्रकारांच्या विविध
विषयावर चर्चा करून पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला
असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न अत्यंत गंभीर असून राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारात धुळखात पडले आहे तसेच पत्रकारांच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला तरच पत्रकारांचे प्रश्न मार्गी लागतील असं प्रतिपादन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी बोलताना सांगितले
या बैठक प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिष कुमार सुना जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र शेवडे जिल्हा अध्यक्ष (महिला विभाग) सुवर्णा सुना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रशांत माळवदे पंढरपूर शहराध्यक्ष दत्ताजी पाटील कार्याध्यक्ष दिनेश खंडेलवाल उपाध्यक्ष राम कृष्ण बिडकर सचिव विश्वास पाटील वीरेंद्र उत्पात सचिन कुलकर्णी चैतन्य उत्पात कबीर देवकुळे बाहुबली जैन अजित देशपांडे संजय यादव विनोद पोतदार खान मुलाणी रफिक आत्तार महेश कदम तानाजी जाधव लखन साळुंखे यांच्यासह आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद