जनतेची गार्हाणी मांडण्यासाठीच अंबरनाथ टाईम्स चा जन्म - कमलाकर सुर्यवंशी

जनतेची गार्हाणी मांडण्यासाठीच अंबरनाथ टाईम्स चा जन्म - कमलाकर  सुर्यवंशी 

  
  उल्हासनगर (अशोक शिरसाट )  
देशभरातील तमाम आदिवासी उपेक्षितांच्या जिवनात क्रांतीमय बदल घडविणार्या  ९ ऑगस्ट रोजी जन्मलेले दैनिक अंबरनाथ टाईम्स ने कायम शोषितांची बाजु मांडलीय. याा वर्तमानपत्राचा जन्म मुळातच सरकार आणि जनतेे तील पारदर्शक दुवा बनण्यासाठी झाला य. आणि गेेली ३५ वर्षे  जनतेच्या न्यायासाठी लढते आहे.  जनतेची गाऱ्हाणी मांडण्यासाठीच अंबरनाथ टाईम्सचा  जन्म झाला आहे असे गौरवोद्गार दैनिक अंबरनाथ टाईम्सचे  मुख्य संपादक कमलाकर सूर्यवंशी यांनी काढले. ते भिमनगर, अंबरनाथ टाईम्सच्या कार्यालयात  दैनिक अंबरनाथ टाईमच्या ३५ व्या वर्धापन दिन साजरा होत असतांना आपले मत व्यक्त करत होते 
    ८ आँगस्ट १९८८ साली  साप्ताहिक ,सांज दैनिक व त्यानंतर दैनिक असा ३५ वर्षांचा खडतर.प्रवास केलेल्या या वर्तमानपत्रात आता सुर्यवंशी परिवाराची तिसरी पिढीही त्याच उमेदिने पत्रकारितेचं व्रत सांभाळत आहे .अंबरनाथ,  ठाण्यासह महाराष्ट्रातील आसपासच्या, राजकीय ,सामाजिक, सांस्कृतिक  घडामोडींचा  वेध घेण्याचे काम दैनिक अंबरनाथ टाइम्स सातत्याने करत आहे. हाती कोणतेही पुरेसे भांडवल, पाठबळ, संपत्ती नसतांंनाही दिग्गज वर्तमानपत्रांच्या शर्यतीत केवळ वाचक आणि हितचिंतकांच्या प्रेमावर हा प्रवास गतिशील होत असल्याची ही भावना दैनिक अंबरनाथ टाईम्स चे कार्यकारी संपादक राजेंद्र सूर्यवंशी यांनी व्यक्त केली 
याप्रसंगी  सूर्यवंशी परिवार, उल्हासनगर प्रतिनिधी अशोक शिरसाट , कल्याण प्रतिनिधी प्रफुल केदारे, बालाजी सूर्यवंशी ,सार्थ उशिरे,सूरेश घाडगे, दिपक दिवटे,दिनकर मोरे, बबनराव ठोकळ, रूतिक सूर्यवंशी, साहिल सूर्यवंशी,आई भिमाबाई,वडिल, नागोराव सूर्यवंशी,आदी  मान्यवर यावेळी  उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार