सी एच एम कॉलेज पासून उल्हासनगर रेल्वे स्टेशन कडे येण्या जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या रहादारीच्या लहान पुलावरून येत आहेत तीन चाकी व चार चाकी वाहने

सी एच एम कॉलेज पासून उल्हासनगर रेल्वे स्टेशन कडे येण्या जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या रहादारीच्या लहान पुलावरून येत आहेत तीन चाकी व चार चाकी वाहने 
उल्हासनगर रेल्वे स्टेशन पासून सी एच एम कॉलेज कडे पाऊलवाटेने येण्या जाण्या साठी पन्नास वर्षा पूर्वी बनवलेला लहान पुल मागील वर्षा पर्यंत मोडकळीस आला होता  काही महिन्यापूर्वीच या रहदारी करण्याच्या पुलाची दुरुस्ती करण्यात आली असून दुरुस्तीच्या वेळी या पुलावरून वाहने जाऊ नये याकरिता लावण्यात आलेले खांब काढण्यात आले आहेत
 यामुळे वाहन चालक याच मार्गाने रेल्वे स्टेशन कडे जात असल्याचे चित्र दिसून येत आहे, अशीच वाहने या रस्त्याने धावू लागली तर काही महिन्यातच राहदारी साठी असलेला पूल नष्ट होण्याची शक्यता नाकरता येत नाही, संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन वाहने अडविण्याचे खांब लावून हा रस्ता फक्त राहदारी साठी करण्याची योजना करावी व येणारे प्रसंग टाळावे 
जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप