अशी ही बनवाबनवी' मधील 'हृदयी वसंत फुलताना...' या एव्हरग्रीन गाण्याला 'टकाटक २'मध्ये एलनाझ नौरोजीचा ग्लॅमरस्पर्श

अशी ही बनवाबनवी' मधील 'हृदयी वसंत फुलताना...' या एव्हरग्रीन गाण्याला 'टकाटक २'मध्ये एलनाझ नौरोजीचा ग्लॅमरस्पर्श
 प्रतिनिधी :- गणेश तळेकर मुंबई 
मराठी सिनेसृष्टीतील माईलस्टोन ठरलेल्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटातील 'हृदयी वसंत फुलताना...' हे सदाबहार गीत पुन्हा नवा साज घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट रिलीज होऊन ३४ वर्षे लोटली तरीही रसिकांच्या मनातील या गाण्याचा बहर आजही ताजातवाना आहे. आजही हे गाणं तितकंच पॅाप्युलर आहे, जितकं पूर्वी होतं. तरुणाईही प्रेमात असलेलं हे गाणं 'टकाटक २'मध्ये नव्या रूपात पहायला मिळणार आहे. ईराणी-जर्मन मॅाडेल एलनाझ नौरोजीच्या ग्लॅमरचा स्पर्श 'हृदयी वसंत फुलताना...' या गाण्याला लाभला आहे. नुकताच ठाण्यातील विवियाना मॅालमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात
'हृदयी वसंत फुलताना...' हे गाणं नव्या रूपात लाँच करण्यात आलं. निर्मात्यांनी अगोदर ९० सेकंदाचे गाणे रिलीज करून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर संपूर्ण गाणे रिलीज करण्याचे ठरविले होते, परंतु संगीत प्रेमींच्या मागणीनुसार निर्मात्यांनी संपूर्ण गाणे आजच रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. हे संपूर्ण गाणे इश्तार म्युझिकच्या यू ट्यूब चॅनल आणि सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे.
मिलिंद कवडे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'टकाटक २' या चित्रपटात 'हृदयी वसंत फुलताना...' या गाण्याचा समावेश करण्यात आल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हृदयी वसंत फुलताना...' या गाण्याच्या तालावर एलनाझ मराठी रसिकांना ठेका धरायला लावणार आहे. 'टकाटक २'मध्ये मुख्य भूमिका साकारणारे कलाकार प्रथमेश परब, प्रणाली भालेराव, अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, कोमल बोडखे या गाण्यात एलनाझच्या जोडीला झळकणार आहेत. गीतकार जय अत्रे यांनी या गाण्याचे पुर्नलेखन केलं असून, गायिका श्रुती राणेच्या आवाजात संगीतकार वरुण लिखते यांनी संगीत दिलं आहे. राहुल संजीर यांनी या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. 'हृदयी वसंत फुलताना हे गाणं आजही अबालवृद्धांमध्ये पॅाप्युलर आहे. 'टकाटक २'च्या माध्यमातून रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ आणि पर्पल बुल एंटरटेनमेंटने जुन्या गाजलेल्या गाण्यांचा नवीन चित्रपटांच्या प्रमोशनसाठी वापर करण्याचा नवा ट्रेंड सुरू केला आहे,
'टकाटक २' निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. १८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
बातमी आणि जाहिराती, न्युज चैनेल/ बातमी जनहित पेपर व ब्लॉग या मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729 संपादक हरी आल्हाट


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या तक्रारीनंतर कामगार नेत्यावर गुन्हा दाखल