पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली पाणी गळती तात्काळ सोडविण्यात आली.*

इमेज
अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली पाणी गळती तात्काळ सोडविण्यात आली उल्हासनगर : प्रतिनिधी दि.२७.१०.२०२२ रोजी मा.आयुक्त महोदय यांच्याशी पिण्याच्या पाणीच्या पाईपलाईनचे लीकेज संदर्भात चर्चा झाली ज्यात उल्हासनगर शहरातील खास करून लालचक्की परिसर, रामनगर, सीताराम नगर, स्टेशन परिसरातील विषयातून मा.आयुक्त साहेबांचे लिकेज संदर्भात लक्ष वेधले असता मा.आयुक्त साहेबांनी सदर लिकेज तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश दिले असता आज दि.२८.१०.२०२२ रोजी महापालिकेमार्फत लिकेजचे काम सुरू झाले व अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली पाणी गळती अखेर सोडविण्यात आली. सदर कामास लिकेज शोधण्यास कर्मचारी यांना त्रास होत होता. शुक्रवार असल्याने महापालिकेचे टँकर देखील बंद होते परंतु काम पूर्ण करण्याच्या हेतूने खासगी टँकर मागवून ज्याची रक्कम स्वःतः प्रदिप गोडसे यांनी आपल्या खिशातून अदा करत टँकरच्या पाण्याच्या सहाय्याने व प्रवाहामुळे लिकेज त्वरित लक्षात आले व संबंधित २० फूट पाईप संपूर्ण खराब असल्याने तो देखील बदली करण्यात आला सदर कामास उल्हासनगर महानगरपालिका यांच्या सहकाऱ्याने काम यशस्वी रित्या पार पाडले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उल्हासनगर शहरातील शिष्टमंडळ यांनी शहरातील समस्या व प्रभागातील विविध समस्यांकरिता घेतली उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांची भेट

इमेज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उल्हासनगर शहरातील शिष्टमंडळ यांनी शहरातील समस्या व प्रभागातील विविध समस्यांकरिता घेतली उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांची भेट उल्हासनगर प्रतिनिधी: शहरातील व प्रभागातील  विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याच्या मनसेच्या मागणी नंतर मा.आयुक्तांचे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना कामाला सुरुवात करण्याचे स्पष्ट आदेश  गुरुवार दि.२७.१०.२०१२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील पदाधिकारी शिष्टमंडळाने दुपारी ४.०० वाजता मा.आयुक्त साहेब अजीज शेख यांची भेट घेत शहरातील विविध समस्यांवर चर्चा केली व पत्रव्यवहार केला. सदर समस्यांमध्ये १) उल्हासनगर शहरातील व तसेच प्रभागातील मोठ्या प्रमाणात वाढते पाण्याचे लिकेज. २) उल्हासनगर शहरातील व प्रभागातील मोठ्या प्रमाणात असलेले असंख्य खड्डे. ३) प्रभागातील पाण्याच्या समस्या विशेषतः पॅनल क्र.१३ मधील ब्राम्हण पाडा, गणेश सीसायटी -१, श्री कृष्ण कॉलनी आणि ज्योती कोलोनी येथील पाणीची समस्या. ४) पॅनल क्र.१३ मधील वॉटर सप्लाय येथे बांधण्यात आलेली पाणीची टाकी सुरू करणे. ५) प्रभातील शौचालय यांची दुरवस्था.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महिला व बालकल्याण विभागाच्या मुलींसोबत भाऊबीज साजरी

इमेज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महिला व बालकल्याण विभागाच्या मुलींसोबत भाऊबीज साजरी  उल्हासनगर प्रतिनिधी दिनांक 26 ऑक्टोंबर 2022 रोजी  महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने उल्हासनगर कॅम्प नंबर पाच मधील महिला व बालकल्याण विभागाच्या अठरा वर्षाखालील मुलींच्या महिला निरीक्षण गृहातील मुलींसोबत मनसे पदाधिकाऱ्यांनी भाऊबीज साजरी केली  यावेळी तीस ते पस्तीस मुलींना मनसेच्या वतीने नवीन कपडे फराळ व मिठाई देऊन भाऊबीज साजरी केली या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बंडू देशमुख, मनोज शेलार, संजय घुगे, अनिल जाधव ,शैलेश पांडव, मुकेश सेठपलानी , सुभाष हटकर, तन्मेश देशमुख, सुहास बनसोडे, सागर चौव्हाण, अनिल गोधडे, गणेश आठवले, सचिन शेलार, रवी अहिरे, रवी सोनवणे, लड्डन रेन, विशाखा गोधडे, सोनी ताई कागडा, ज्योती वाघ, पुनम मनोज शेलार, उमा जाधव, विजय बनसोडे, शकुंतला सावंत, इमलाबाई जाधव, सुमन कोळेकर, अश्विनी नायकर, तसेच अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हास

अखेर शिधावाटप दुकानातून नागरिकांना ऑफलाईन पद्धतीने दिवाळी किट उपलब्ध.

इमेज
*अखेर शिधावाटप दुकानातून नागरिकांना ऑफलाईन पद्धतीने दिवाळी किट उपलब्ध.* रविवार दि.२३.१०.२०२२ रोजी सकाळी १०.३०च्या सुमारास लालचक्की विभागात सर्वच रेशन दुकानदार यांचे थंबचे सर्व्हर डाउन असल्याने  कोणत्याच शिधावाटप ग्राहकाला शिधावाटप दुकानदार दिवाळी किट देत नसल्याची तक्रार ॲड.प्रदिप गोडसे यांना फोन वर अनेक नागरिकांनी दिली.  त्यानुषंगाने त्यांनी थेट शिधावाटप अधिकारी ज्योती तांबेकर मॅडम यांना संपर्क करून सदर दिवाळी किट ऑफलाईन पद्धतीने देण्यास सांगितले.    त्यानंतर शिधावाटप अधिकारी ज्योती तांबेकर मॅडम यांनी तात्काळ शिधावाटप दुकानदार यांना आदेश देऊन दिवाळी किट ही प्रत्येक शिधावाटप ग्राहकाला उपलब्ध करून देण्यास सांगितले. तसे आदेश प्रदी गोडसे यांच्या फोन वरून दुकानदार यांना देण्यात आले.    त्यांनतर शिधावाटप दुकानदार यांनी त्वरित ऑफलाईन पद्धतीने नागरिकांना दिवाळी किट देण्यास सुरुवात केली.     अनेक तासंपासून दिवाळी किटसाठी वंचित ठेवलेल्या सर्व रेशन धारकांनी मानले ॲड.प्रदिप गोडसे यांचे आभार..!    तरी ज्या रेशनधारकास रेशन दुकानदार दिवाळी किट पासून वंचित ठेवत असेल त्यांनी  उल

परिवर्तन एक लोक चळवळीचा धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेषांक धम्मक्रांती प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात उल्हासनगर येथील त्रैलोक्य बुध्द विहारात संपन्न

इमेज
परिवर्तन एक लोक चळवळीचा धम्मचक्र प्रवर्तन दिन विशेषांक धम्मक्रांती  प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात उल्हासनगर येथील त्रैलोक्य बुध्द विहारात संपन्न  उल्हासनगर: दिनांक 15 ऑक्टोंबर 2022  पावसाळी वाावरण आणि प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता अनेक मान्यवर पाहुण्यांनी  फोन वरुन  येण्याविषयी असमर्थता दर्शवली होती स्थानिकचेही कोणी येताना दिसत नव्हते पाऊस वाढत होता त्यातच कोणी लाईट जाण्याची भिती व्यक्त करत होते. एकूण काय तर कार्यक्रम होईल की नाही ? या द्वंदात अडकून पडाव अशी परिस्थिती निर्माण झाली असताना देखिल आम्हीं आमचे मार्गदर्शक आणि काही सहकारी कार्यक्रम होणारच या विश्वासावर अढळ होतो ठाम होतो शेवटी आमच्या विश्वासाने सकरात्मक तेने परिस्थितीवर मात केलीच चळवळीत काम करतांना असे अनेक पावसाळे आणि उन्हाळे आम्ही पाहिले आहे त्यात निर्माण झालेल्या सीचिवेशनवर संयम पाळून धिरो धत्तपणे नैतिकतेच्या, सत्याच्या आणि प्रामानिक्तेच्या बळावर सकारात्मकतेने. सहकारी मित्रांसह मात केली आहे काल ही तेच झाले.. वातावरण निवळले सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक प्रमुख पाहुणे आणि चळवळींचे प्रमुख पदाधिक

वैभव आणि पूजा म्हणतायेत ‘चल अब वहाँ’

इमेज
वैभव आणि पूजा म्हणतायेत ‘चल अब वहाँ’ हिंदी अल्बममध्ये दिसणार वैभव आणि पूजाचा रोमँटिक अंदाज  मुंबई महाराष्ट्र : गेल्या काही दिवसांपासून  वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत ही प्रेक्षकांची आवडती जोडी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र हे दोघे नेमके कशासाठी एकत्र येणार याचा खुलासा मात्र झाला नव्हता. नुकतीच या दोघांनी ‘चल अब वहाँ’ या आपल्या आगामी रोमँटिक हिंदी सॉंग अल्बमची घोषणा करत आपल्या चाहत्यांना ‘सरप्राइज’ दिलं आहे. नुकताच या अल्बमचा प्रकाशन  सोहळा दिमाखात संपन्न झाला. मराठी रुपेरी पडद्यावरची ही हिट जोडी आता ‘चल अब वहाँ’ या ‘व्हिडीओ पॅलेस’ निर्मित पहिल्या हिंदी अल्बममध्ये आपल्याला रोमँटिक अंदाजात दिसणार आहे.  ‘चल अब वहाँ’ मीठी जहाँ बोलिंया’ ! ‘चल अब जहाँ’ राते दिवाली हो, दिन हो होलिया’! असे बोल असणाऱ्या या गाण्यातून वैभव आणि पूजा यांच्या प्रेमाचा सदाबहार रंग दिसणार आहे. आपल्या या नव्या अल्बमबद्दल बोलताना हे दोघं सांगतात, ‘काश्मीरमधील निसर्गरम्य ठिकाणी शूट करण्याचा आनंद तर होताच पण या गाण्याच्या निमित्ताने आम्हाला पुन्हा एकत्र काम करता आलं हे आमच्यासाठ

मराठी सिनेपटलावर अवतरणार 'सुभेदार'

इमेज
मराठी सिनेपटलावर अवतरणार 'सुभेदार' दिग्पाल लांजेकरच्या नजरेतून शिवकालीन इतिहासातील सुवर्ण महाअध्याय 'शिवराज अष्टक'मधील पाचवा चित्रपट मुंबई महाराष्ट्र : मागील काही वर्षांपासून मराठी सिनेपटलावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्यगाथांचा देदीप्यमान जागर सुरू आहे. वर्तमानकाळात रसिकांना शिवकालीन इतिहासाच्या क्षणांचे साक्षीदार बनवण्याच्या या वाटेवर लेखक-दिग्दर्शक-अभिनेता-निर्माता दिग्पाल लांजेकरचे मोलाचे योगदान आहे. दिग्पालने दिग्दर्शित केलेल्या 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' या शिवराज अष्टकातील चार यशस्वी चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत राष्ट्रीय पातळीवरील रसिकांचेही लक्ष वेधून घेतलं आहे. 'शेर शिवराज' नंतर दिग्पाल लांजेकर शिवकालीन इतिहासाच्या सुवर्णपानांमध्ये दडलेला कोणता अध्याय घेऊन येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. दिग्पालने शिवराज अष्टकातील पाचव्या सिनेमाची घोषणा केल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. दिग्पाल लांजेकरच्या संकल्पनेतील 'शिवराज अष्टक' या शिवचरित्रा

कामगार कल्याण केंद्र गोरेगाव च्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

इमेज
कामगार कल्याण केंद्र गोरेगाव च्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर मुंबई:  कामगार कल्याण केंद्र गोरेगाव च्या वतीने आज  दिनांक 12/10/2022 कॅपसिटी इनफॅस्टक्चर बोरिवली   (BOCW) येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले त्यावेळी रमेश चव्हाण एडमिन मॅनेजर तसेच श्री. प्रणय मोरे जनरल मॅनेजर उपस्थिति होते सदर शिबीरा मध्ये 250 कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली सदर  आरोग्य शिबीर निलेश  यशवंत  पाटील केंद्र संचालक व वैशाली लामखडे  यांनी आयोजित केले होते. ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र मुंबई  बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729 बातमी जनहित या साप्ताहिक पेपर मध्ये दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी फोटो किंवा बॅनर dtp पाठवा पद व नावं व्यवस्थित लिहून पाठवा आपली देणगी Gpay 9960504729 वर पाठवा