अखेर शिधावाटप दुकानातून नागरिकांना ऑफलाईन पद्धतीने दिवाळी किट उपलब्ध.
रविवार दि.२३.१०.२०२२ रोजी सकाळी १०.३०च्या सुमारास लालचक्की विभागात सर्वच रेशन दुकानदार यांचे थंबचे सर्व्हर डाउन असल्याने कोणत्याच शिधावाटप ग्राहकाला शिधावाटप दुकानदार दिवाळी किट देत नसल्याची तक्रार ॲड.प्रदिप गोडसे यांना फोन वर अनेक नागरिकांनी दिली. त्यानुषंगाने त्यांनी थेट शिधावाटप अधिकारी ज्योती तांबेकर मॅडम यांना संपर्क करून सदर दिवाळी किट ऑफलाईन पद्धतीने देण्यास सांगितले.
त्यानंतर शिधावाटप अधिकारी ज्योती तांबेकर मॅडम यांनी तात्काळ शिधावाटप दुकानदार यांना आदेश देऊन दिवाळी किट ही प्रत्येक शिधावाटप ग्राहकाला उपलब्ध करून देण्यास सांगितले. तसे आदेश प्रदी गोडसे यांच्या फोन वरून दुकानदार यांना देण्यात आले.
त्यांनतर शिधावाटप दुकानदार यांनी त्वरित ऑफलाईन पद्धतीने नागरिकांना दिवाळी किट देण्यास सुरुवात केली.
अनेक तासंपासून दिवाळी किटसाठी वंचित ठेवलेल्या सर्व रेशन धारकांनी मानले ॲड.प्रदिप गोडसे यांचे आभार..!
तरी ज्या रेशनधारकास रेशन दुकानदार दिवाळी किट पासून वंचित ठेवत असेल त्यांनी
उल्हासनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड प्रदिप गोडसे यांना 9665444445 या नंबर वर फोन करून काळवावेत असे ॲड. प्रदिप गोडसे यांनी सूचना देखील दिल्या आहेत.
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र ९९६०५०४७२९
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद