महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उल्हासनगर शहरातील शिष्टमंडळ यांनी शहरातील समस्या व प्रभागातील विविध समस्यांकरिता घेतली उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांची भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उल्हासनगर शहरातील शिष्टमंडळ यांनी शहरातील समस्या व प्रभागातील विविध समस्यांकरिता घेतली उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांची भेट
उल्हासनगर प्रतिनिधी: शहरातील व प्रभागातील विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याच्या मनसेच्या मागणी नंतर मा.आयुक्तांचे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना कामाला सुरुवात करण्याचे स्पष्ट आदेश
गुरुवार दि.२७.१०.२०१२ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील पदाधिकारी शिष्टमंडळाने दुपारी ४.०० वाजता मा.आयुक्त साहेब अजीज शेख यांची भेट घेत शहरातील विविध समस्यांवर चर्चा केली व पत्रव्यवहार केला.
सदर समस्यांमध्ये
१) उल्हासनगर शहरातील व तसेच प्रभागातील मोठ्या प्रमाणात वाढते पाण्याचे लिकेज.
२) उल्हासनगर शहरातील व प्रभागातील मोठ्या प्रमाणात असलेले असंख्य खड्डे.
३) प्रभागातील पाण्याच्या समस्या विशेषतः पॅनल क्र.१३ मधील ब्राम्हण पाडा, गणेश सीसायटी -१, श्री कृष्ण कॉलनी आणि ज्योती कोलोनी येथील पाणीची समस्या.
४) पॅनल क्र.१३ मधील वॉटर सप्लाय येथे बांधण्यात आलेली पाणीची टाकी सुरू करणे.
५) प्रभातील शौचालय यांची दुरवस्था.
या सर्व मुद्द्यांवर मा.आयुक्त साहेब यांच्याशी तोंडी स्वरूपात चर्चा झाली व सोबत प्रभागातील समस्यांवर लेखी निवेदन जिल्हा उपाध्यक्ष ॲड.प्रदिप गोडसे, शहर संघटक मेनुद्दीन शेख व उपविभाग अध्यक्ष रवी बागुल यांच्या वतीने देण्यात आले. सदर चर्चेत मा.आयुक्त साहेब यांनी संबंधित अधिकारी यांना फोन लावून सर्व प्रथम पाऊस पडणे बंद झाले असल्याने व टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने खड्डे भरण्याचे आदेश दिले व उद्या पासून तात्काळ डांबर प्रक्रियेतून खड्डे भरणे सुरू करावेत असे आदेश देण्यात आले. त्यांनतर मनसे शिष्टमंडळाने खड्डे भरतांना काही सूचना मा.आयुक्त साहेब यांना दिल्या त्यात खड्डे भरतांना अगोदर खड्डे भरतांना जो भराव आपण खड्डेयात टाकून खड्डे भरले गेले होते ते पूर्णतः काढून साफ करून मग त्याच्यावर डांबर माल टाकून खड्डे भरावेत आणि पुन्हा खड्डे होऊ नये याकरिता खड्डे भरण्याच्या अगोदर सर्वात पाहिले पाण्याच्या पाईपचे लिकेजस संपूर्णतः काढून मगच त्यावर डांबरचा माल टाकावा. यावर मा.आयुक्त साहेबांनी मनसेने दिलेल्या सूचनांची दखल घेत सदर च्या सूचना पाळून खड्डे भरावेत व त्याअगोदर पाण्याच्या पाईप लाईनचे लिकेज काढावेत असे आदेश त्यांनी दिले. व त्यासंदर्भात संबंधित अधिकारी यांच्याशी भेट घेण्याचे देखील सांगितले त्यानुषंगाने मनसे शिष्ट मंडळ यांनी पाणी पुरवठा अधिकारी श्री.वानखेडे साहेब व पाटील साहेब यांची भेट घेत मा.आयुक्त साहेबांनी दिलेल्या सूचनांची चर्चा केली *त्यावर त्यांनी देखील ठेकेदार नेमून त्यांना तात्काळ लिकेज काढण्यास सांगितले सर्व प्रथम लालचक्की चौक, उल्हासनगर -४ व उल्हासनगर - १ येथील लिकेज तात्काळ काढण्याचे आदेश संबंधित ठेकेदारास दिले व प्रभाग १३ मधील पाणी समस्या सोडविण्याकरिता आश्वासन दिले त्यात प्रथम ज्योती कॉलनीला पाणी पुरवठा करण्याकरिता स्वतंत्र पाईप लाईन टाकण्याचे आदेश दिले
यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन कदम,उप-जिल्हा अध्यक्ष ॲड.प्रदीप गोडसे,शहर संघटक मैनुद्दीन शेख,उप-शहर अध्यक्ष शैलेश पांडव,सुभाष हटकर,म न वि से चे शहर अध्यक्ष वैभव कुलकर्णी,वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात,विभाग अध्यक्ष कैलाश वाघ,उप-विभाग अध्यक्ष आशिष सोनी,मधुकर बागुल,शाखा अध्यक्ष संजय नार्वेकर,अजय बागुल,पंकज राजगुरू आणि मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते __________________________________________
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र
रब्बर स्टॅम्प स्वस्त दरात बनवून मिळतील संपर्क 8830631406
__________________________________________
संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद