संविधानाचे जनक विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना

संविधानाचे जनक विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना          अंबरनाथ : 26/11/2022 
भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधुन सर्वसामान्य वंचित व बहुजनांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणारे संविधानाचे जनक विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना भटके विमुक्त समाजाच्या वतिने देण्यात आली. याप्रसंगी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे, भटके विमुक्तांचे नेते भिमराव ईंगोले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.वंचित व शोषित समाजाचे प्रश्न स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही जसेच्या तसेच आहे याचे दुःख असल्याची खंत भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यानी बोलताना व्यक्त केली.
स्वातंत्र्यापूर्वि इंग्रजानी गुन्हेगारी कायदा लागू करून छळले, स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानी समाज कुठे आपले जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करतो असे वाटत असताना विकासाच्या नावाखाली भटके विमुक्त समाजाच्या वस्तीवर अनधिकृत ठरवून कारवाई करण्यात येत असल्याबद्दल तिव्र नाराजी व्यक्त केली.        ब्यूरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप