२०२२ ची होपमिरर चॅम्पियन्स ट्रॉफी ओवे गाव येथे मोठ्या उत्साहात
२०२२ ची होपमिरर चॅम्पियन्स ट्रॉफी ओवे गाव येथे मोठ्या उत्साहात
ओवे, खारघर येथे, होपमिरर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईतील एक संस्था गरिबी कमी करण्यासाठी आणि ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि इतर कारणांसाठी कार्य करते. नुकतेच संस्थेने क्रिकेट सामन्यांचे नियोजन केले होते. ग्रामीण आणि स्थानिक समुदायांमध्ये खेळांचा प्रचार आणि विकास करणे हे संस्थेचे ध्येय आहे. म्हणूण होपमिरर चॅम्पियन्स ट्रॉफी विनामूल्य घेण्यात आली. यावेळी कल्याण, कर्जत, शहापूर आणि भिवंडी आदिवासी संघ या स्पर्धेत सहभागी झालेल्या १६ हून अधिक संघांचा समावेश होता. एक चॅरिटी शो सामना देखील झाला ज्यामध्ये भारतीय खेळाडू व्हीलचेअर क्रिकेट टीम चा सामना झाला .
व्हीलचेअर क्रिकेट संघाला पाठिंबा देणे आणि त्याचा प्रचार करणे हे होपमिरर फाउंडेशन चे ध्येय आहे. तळोजा आणि खारघर पोलीस स्टेशन एक शो मॅच घेण्यात आला. विक्रांत पाटील, गुरु म्हात्रे, दिलशाद खान- संपादक मुंबई हलचल, शबनम शेख, अक्रम शेख, अयुब शेख यांची उपस्थित होती. या कार्यक्रमाचा शुभारंभ सचिनशेठ पाटील यांनी केला. रायगड समालोचक संघाचे अध्यक्ष संदिप पाटील यांचे संघाकडून विशेष आभार मानले जातात. ओवे संघाने २०२२ मध्ये होपमिरर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि मुरबी संघ दुसऱ्या स्थानावर राहिला.
कलागुणांना वाव देण्यासाठी या
"होपमिरर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. असे होपमिरर फाऊंडेशनचे अध्यक्ष रमजान शेख बोलताना सांगितले. आदिवासी भागातील खेळांना प्रोत्साहन देणे, विशेषत: वंचित वर्ग आणि आदिवासी, तसेच व्हीलचेअर क्रिकेट संघ यांना त्यांची कला दाखवण्यासाठी
नेहमीच नवीन नवीन उपक्रम घेत राहू असे शेख यांनी सांगितले.
प्रतिनिधी आशा रणखांबे जनहित न्युज महाराष्ट्र खारघर बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी आल्हाट 9960504729
ठाणे जिल्हा प्रतिनिधी आशा रणखांबे
साप्ताहिक बातमी जनहित या बातमी पत्रात आपल्या व्यावसायिक जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क 9960504729
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद