ठाणे जिल्ह्याची जलजीवन वाहिनी पुन्हा एकदा जलपर्णी च्या विळख्यात...नयथरपाडा कांबागाव मोटरपंप हाऊस जवळ जलपर्णीदर्शन.

उल्हास नदी,
ठाणे जिल्ह्याची जलजीवन वाहिनी पुन्हा एकदा जलपर्णी च्या विळख्यात...

नयथरपाडा कांबागाव मोटरपंप हाऊस जवळ जलपर्णीदर्शन..
कल्याण : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर,  कल्याण डोंबिवली महानगर पालिका आदी शहरी भागातील नागरिकांची तहान भागविणारी उल्हास नदी पुन्हा एकदा जलपर्णी च्या विळख्यात सापडत असून ही जलपर्णी म्हणजे वाढत्या प्रदूषणाची लक्षणे मानली जात आहे. त्यामुळे लोकांना आता दूषित पाण्याला व त्यापासून होणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागणार असे दिसते. 
कल्याण तालुक्यात उल्हास, बारवी, काळू आणि भातसा या चार बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. यातील उल्हास नदीच्या पाण्यावर कल्याण तालुक्यातील शेकडो ग्रामपंचायती व विविध महानगर पालिका अंवलबून आहेत मागील काही वर्षांपूर्वी उल्हास नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी उगवली होती. नदीचे पात्र आहे की हिरवागार गालिचा  हे समजत नव्हतं. या जलपर्णी मुळे अनेक जलचर प्राणी ऑक्सीजन अभावी मरत होते या मागील शोध घेतला असता या जलपर्णी दूषित पाण्यामुळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते. बदलापूर, कर्जत, अंबरनाथ, आणि पुढे कल्याण येथे फार्महाऊस, इमारती मधील सांडपाणी, केमिकल रसायन, तबेले, शहरांचे सांडपाणी, ड्रेनेज लाईन, यांचे प्रक्रिया न केलेले पाणी सरळ उल्हास नदीपात्रात येत असल्याने जलपर्णी वाढत होती. 
त्यामुळे या विरोधात उल्हास नदी बचाव कृती समिती व इतर अनेक सामाजिक संघटना यांनी उल्हास नदीच्या वाढत्या प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक उपक्रम राबविले शिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी दाखल केल्या. ऐवढ्या वरच न थांबता सामाजिक जाणीवेतून जलपर्णी नदी पात्राबाहेर काढण्याचे काम देखील केलेले होते. त्यामुळे काही काळ तरी ही नदी स्वच्छ झाली होती. परंतु आता पुन्हा नयथरपाडा कांबागाव  मोटरपंप हाऊस जवळ जलपर्णी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा जलपर्णी काढण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे.
बातमीदार शशिकांत दायमा जनहित न्युज महाराष्ट्र 
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सम्पर्क साधा 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार