डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन ब्राह्मणी येथील दोन दिवसीय शिबिरात 2 नोव्हेंबर 2025 व 3 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या ज्येष्ठ नागरिक सहाय्यक साधने मोफत वाटप शिबिरात 721 ज्येष्ठ नागरिक लाभार्थी तपासणी होऊन पात्र झालेले आहेत या सर्व लाभार्थ्यांना मिळणाऱ्या एकूण सहाय्यक साधनांची किंमत 67 लाख 13 हजार 238 रुपये इतकी आहे सर्व लाभार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सुजय दादा विखे पाटील व सन्माननीय अक्षय दादा कर्डिले, यांच्या उपस्थितीत लवकरच या सहायक साधनांचा प्रत्यक्ष वाटप समारंभ आयोजित केला जाईल. याप्रसंगी वारकरी संप्रदायाचे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण नाना बानकर, जिल्हा परिषद माजी सदस्य विक्रम राव तांबे, सरपंच सौ सुवर्णाताई बानकर, उपसरपंच महेंद्र तांबे, विजय वानकर, भाजपा तालुका...
फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले पनवेल शहरातील तक्का परिसरात शनिवारी (दि.२८) सकाळी एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली. फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले असून, त्यासोबत सापडलेल्या एका इंग्रजीतील भावनिक चिठ्ठीने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे. आपल्या बाळाला सांभाळण्यास असमर्थ असल्याचे या चिठ्ठीतून पालकांनी म्हटले आहे. नेमके काय घडले? शनिवारी सकाळी तक्का परिसरातील नागरिकांना एका बास्केटमधून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता, त्यांना बास्केटमध्ये एक नवजात बाळ दिसले. नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ पनवेल शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. चिठ्ठीतील भावनिक मजकूर समोर बास्केटमध्ये बाळासोबत एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी सापडली, ज्यामुळे या घटनेला एक भावनिक वळण मिळाले ...
उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन 6 तासांत रुग्णवाहिका आली नाही रुग्णाने सोडले प्राण जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी नोटीस बजावली होती. याबाबत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले. रुग्णवाहिकेसाठी 108 क्रमांकावर फोन केला जातो. त्यानंतर काही वेळेतच रुग्णवाहिका येत असल्याचा दावा केला जातो. परंतु उल्हासनगरमध्ये वेगळाच प्रकार घडला. अत्यवस्थ असलेल्या रुग्णास नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिकेला फोन केला. परंतु एक तास झाला, दोन तास झाले तरी रुग्णवाहिका आली नाही. फोन केल्यावर सहा तास झाल्यावरही रुग्णवाहिका आली नाही. अखेर चिंताजनक प्रकृती असलेल्या त्या रुग्णाने प्राण सोडला. या प्रकरणात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन करण्यात आले. ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद