आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी घेतले श्री शंभू शंकराचे मनोभावे दर्शन

आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी घेतले श्री शंभू शंकराचे मनोभावे दर्शन अंबरनाथ : शहराची ओळख असलेल्या प्राचीन शिवमंदिरात आज महाशिवरात्री निमित्त आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी श्री शंभू शंकराची मनोभावे पूजा करत दर्शन घेतले अंबरनाथ व उल्हासनगर शहराचा राज्याचे मुख्यमंत्री ना.श्एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या सहकार्याने विकास करण्याचा जो निश्चय केला आहे त्याला यश देत शहरवासीयांना सुख व समृद्धी लाभो अशी आमदार डॉ.किणीकर यांनी प्रार्थना केली.
या शहरांच्या मध्यभागी वसलेले हे शिव मंदिर तमाम शिवभक्तांसाठी ऊर्जास्थान असून दरवर्षी लाखोच्या संख्येने ठाणे जिल्ह्यासह राज्यातील कानाकोपऱ्यांतून भाविक भोलेनाथाचे दर्शन घेण्यास येथे येऊन शिवयात्रेत सहभागी होत असतात, या भाविकांसह यात्रेत सहभागी होत भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले आणि महाशिवरात्रीच्या व शिवयात्रेच्या शुभेच्छा दिल्या. बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सम्पर्क साधा संपादक हरी आल्हाट ९९६०५०४७२९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले