पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्या पत्रकार सुरक्षा समितीची मागणी
पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा द्या पत्रकार सुरक्षा समितीची मागणी
उल्हासनगर (अशोक शिरसाट ) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर मध्ये ज्येष्ठ पत्रकार शशिकांत वारिशे यांची रिफायनरीच्या एका दलालाने अपघात घडवुन निर्घुण हत्या केली . या हत्येचा सर्वत्र निषेध होत आहे . तेव्हा वारिशे यांची हत्या करणाऱ्या आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवुन त्या आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी , अशी मागणी, पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिह्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी उल्हासनगर व पोलिस उपायुक्त परिमंडळ ४ यांना निवेदन दिले आहे
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर मध्ये ज्येष्ठ पत्रकार शशिकांत वारिशे यांची रिफायनरी च्या दलालानी हत्या केली आहे . या हत्येचा निषेध करण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी , पोलिस उपायुक्त डॉ . सुधाकर पठारे यांना निवेदन देवुन निषेध केला आहे . निवेदन देताना पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज जैन , जिल्हा महासचिव रामेश्वर गवई ,सचिव जाफर वणू , उपाध्यक्ष संजय साळवे , संघटक विशाल कुरकुटे , अशोक एफ शिरसाट , संदिप साळवे , नितीन पाटणकर , साहिल यदुवंशी , कुलदिप सागर , जगनसिंग राजपुत , सुभाष खेडेकर , सुभाष हटकर आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद