कसबा विधानसभा मतदार संघात प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त दहा हजार वाहनांची तपासणी


कसबा विधानसभा मतदार संघात प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त दहा हजार वाहनांची तपासणी
पुणे : कसबा विधानसभा मतदार संघात प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भरारी पथक, नाका तपासणी पथकाकडून आतापर्यंत दहा हजार ६६८ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. निवडणुका शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याकरिता प्रशासनाने नियोजन केले आहे. आचारसंहितेचे पालन करण्याबाबत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.प्रशासनाकडून कसब्यात नऊ तपासणी नाके, तसेच नऊ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांमार्फत संपूर्ण मतदारसंघात वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. तसेच भरारी पथकाकडून संपूर्ण प्रचार यंत्रणेचे चित्रीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत भरारी आणि नाका तपासणीमध्ये दहा लाख ५३ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले आहेत, तर १२ हजार २५० किमतीचे २३१ लिटर मद्य हस्तगत करण्यात आले आहे. आचार संहितेचे पालन करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे , अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार