अंबरनाथ मध्ये शिवजन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा

अंबरनाथमध्ये_प्रथमच_भक्ती_शक्ती_चौकात_शिवजन्मोत्सव_मोठया_उत्साहात_साजरा!. 
आगळा वेगळा शिव जयंती उत्सव
मा. नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या संकल्पनेतून भक्ती शक्ती शिल्प उभारण्यात आलेल्या चौकामध्ये मा.सुभाष साळुंके व सुवर्णा साळुंके यांनी अंबरनाथ मध्ये प्रथमच शिवजन्मोत्सव व तुकाराम बीजे चे औचित्य साधून भजन संध्या, शिवजन्मोत्सव, शिवकालीन गाणी,नृत्य, पाळणा, फटाक्यांची आतिषबाजी तसेच शिवकालीन वेशभूषा इ. कार्यक्रम दि.९ व १० मार्च २०२३ रोजी मोठया उत्साहात साजरे करण्यात आले.
जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या वैंकुठगमन अर्थात तुकाराम बीज निमित्त वारकरी परंपरा जपत दि.९ मार्च रोजी सायं ७ ते ११ यावेळेत संगतीमय भजन संध्या स्थानिक पुरुष व महिला भजनी मंडळे सादर करुन उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. 
 वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. अशोक भगत यांनी जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या भक्ती शिल्पास पुष्पमाला अर्पण करून तसेच सुभाष साळुंके,ह भ प मोरे महाराज व उत्तेकर महाराज यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून संगीतमय भजन संध्या कार्यक्रमाची सुरुवात केली
रात्री ११ ते १२ वा. अंबरनाथमध्ये पहिल्यांदाच शिवजन्मोत्सव  संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ सुवर्णा साळुंके यांच्या संकल्पनेतून दिमाखदार सोहळा पार पडला, यावेळी "झुलवा पाळणा बाल शिवाजीचा" या गाण्यावर महिलांनी  मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने नृत्य सादर केले तसेच  शिवजन्मोत्सव पाळणा गायन करुन शिवकालीन प्रसंग उभा राहिला. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊची भूमिका सौ. सुवर्णा साळुंके यांनी साकार केली, याप्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करून दिमाखदार सोहळा पार पडला.
यावेळी गड किल्ले येथे नियमित स्वच्छ्ता मोहिम राबविणारे करणारे, विविध ठिकाणी शिवकार्य करणारे शिवप्रेमी संस्था यांचा प्रातिनिधिक स्वरूपात भक्ती शक्ती प्रतिमा देऊन छत्रपती शासन प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री. नरेश गायकर, सहयाद्री प्रतिष्ठान चे राहुल पवार व सोमनाथ पांचाळ यांचा शिव सन्मान केला.
 सदर राबविलेल्या  शिवभक्त व शिवप्रेमींनी सुभाष साळुंके यांचे  कौतुक केले सदर कार्यक्रम अंबरनाथ विविध ठिकाणी मोठया प्रमाणात राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन करून आभार  मानले.
दि.१० मार्च २३.. भक्ती शक्ती चौक...
दु.१२.३० वा. भक्ती शक्ती चौक येथे स्वराज्य संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव प्रतिमेचे पूजन आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, सौ. प्रज्ञा बनसोडे,माजी नगरसेवक, युवासेना पदाधिकारी, महिला आघाडी व शिवसैनिक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
@सायं.६ ते ९ वा. शिवकालीन वेशभूषा स्पर्धा  पार पडली, यावेळी लहान मुलांनी बाल शिवाजी व हिरकणी वेशभूषा सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. मुलांना बक्षिसे देऊन सन्मान केला. यावेळी शिवप्रेमींनी डेजे वरील गाण्यांचा मनमुराद आनंद लुटला.
अत्यंत आगळावेगळा शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी सौ. सुवर्णा साळुंके,सौ. सुनंदा मांढरे,सौ. वैशाली शेलार, मानसी साळुंके, सिद्दी शेलार, सुनीता रघुनाथन, श्रद्धा परदेशी, सुषमा आचरेकर, रुपाली मोरे, सुवर्णा नरे, सुमित बनसोडे, नंदू शेलार, राजकुमार जमखंडीकर, विलास शेट्ये, गोविंद शेडगे,चंद्रकांत फलके, निलेश चौधरी इ.नी परिश्रम घेतले.
यावेळी शिवसेना पदाधिकारी, वारकरी संप्रदाय, शिवप्रेमी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, संवाद फाउंडेशन व जॉगर्स क्लब चे सदस्य उपस्थित होते.
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा