उल्हासनगर मधील मेट्रो स्टेशनला सिंधूनगर ऐवजी स्व.गोपीनाथ मुंढे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी ने केली

उल्हासनगर मधील मेट्रो स्टेशनला सिंधूनगर ऐवजी
 स्व.गोपीनाथ मुंढे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी ने केली

उल्हासनगर शहरात शासनाकडून मेट्रो रेल्वे प्रकल्प राबविण्यात येणार आहे.ही वार्ता उल्हासनगर शहरात चालू आहे मेट्रो येणार तर स्थानक ही असणारच आहे त्या मेट्रो स्थानकाला नाव हे सिंधूनगर देण्याचे शहरातील सत्ताधारी राजकीय नेत्यांनी पररस्पर निर्णय घेतला सुद्धा आहे.
 म्हणून वंचित_बहुजन_आघाडी प्रभाग क्र ४ च्या वतीने ह्या निर्णयाचा विरोध करत शहरात येणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या स्थानकाचे नाव सिंधूनगर न करता महाराष्ट्र घडवण्यासाठी जीवन झिजणारे बहुजनांसाठी लढणारे लोकनेते बहुजन नेते स्वर्गिय गोपिनाथ_मुंडे_साहेब हे नाव देण्यात यावे.
 अशी मांगणी करण्यात आली आहे आज प्रांत कार्यालयावर निवेदन देण्यात आले निवेदन वंचित बहुजन आघाडीचे शहर सचिव हरेशभाऊ कथले,युवा शहर उपाध्यक्ष उज्वलभाऊ महाले (रंगीला), प्रभाग निरिक्षक ईश्वरभाऊ सोनवणे,शहर उपाध्यक्ष सुरेंद्र तिडके,वार्ड अध्यक्ष नितिन भालेराव,आरोग्य विभाग तात्या केदार, वार्ड उपाध्यक्ष मुकेश चौथमल,वरिष्ठ कार्यकर्ते तात्या महाराज,वरिष्ठ कार्यकर्ते धनराज मोरे, वरिष्ठ कार्यकर्ते संजय खरे, युवा कार्यकर्ते मनोज जगताप,युवा कार्यकर्ते संदिप मोरे,युवा कार्यकर्ते लक्ष्मण मोरे.युवा कार्यकर्ते सुनिल कदम या सर्व कार्यकर्त्यांनी दिले आहे. अशी माहिती उज्वल महाले यांनी दिली 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार