शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला

शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला 
           देवेंद्र फडणवीस काय म्हणाले…

नागपूर: 
नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी
 संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी कर्मचाऱ्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाबद्दल विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याची बातमी मला तुमच्याकडूनच समजली. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न होता, तो आम्ही समजून घेतला आहे. यामध्ये आम्ही कुठेही अहंकार न ठेवता त्यांच्याशी संवाद साधला.”
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “कर्मचाऱ्यांना जे सामाजिक संरक्षण हवं आहे. त्यांना निवृत्तीनंतर जे फायदे हवे आहेत, त्यासंदर्भात जे तत्व आहे, ते आम्ही मान्य केलं आहे. याची कार्यवाही कशी करायची, यासाठी एक समिती काम करत आहे. सरकारने कुठेही आडमुठी भूमिका न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला. त्यासाठी मी कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा सरकारच्या वतीने सांगू इच्छितो की, सगळे कर्मचारी आमचेच आहेत. त्यांना जे चांगल्यात चांगलं देता येईल, ते देण्याचा प्रयत्न करणं ही आमची जबाबदारी आहे.”

“ही समिती तीन-चार ठरलेल्या मुद्द्यांवर अहवाल सादर करेल. त्या अहवालाच्या आधारावर आम्हाला पुढची कारवाई करता येईल. संवादातून तोडगा निघतो, असं आम्ही सातत्याने म्हणत होतो. आता संवाद झाला आहे. त्यामुळे मी कर्मचाऱ्यांचं स्वागत करतो. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचं आभार मानतो. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे, समितीने अहवाल सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल,” अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप