राज्यभरातून राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्यभरातून राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण प्रतिनिधी आशा रणखांबे
२२ मे २०२३
कल्याण: श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच तर्फे आयोजित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर, लिखाणावर तसेच त्यांनी केलेल्या भाषणावर अभ्यास व्हावा, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत सहभाग दर्शविला.
निबंध स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. सुमेध पारधे, कवी साहित्यिक नवनाथ रणखांबे, कवी ॲड. प्रज्ञेश सोनावणे आणि इंजि. गौतम बस्ते यांनी परीक्षक म्हणून सहभाग नोंदवला तसेच श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था उल्हासनगर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच उल्हासनगर सर्व सभासद सहकारी ह्याचे ही मोलाचे योगदान लाभले. या स्पर्धेत एकूण ८० स्पर्धकांनी भाग घेतला होता. पारितोषिक विजेते आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांचे आयोजकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
ह्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक - शेख अल्यार शेख रज्जाक, बुलढाणा ( गट ब ) विषय- वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरची आव्हाने आणि त्याचे समाधान व द्वितीय पारितोषिक (गट अ) - कोल्हापूर स्नेहल पंकज पाटील, विषय- लोकशाही आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर तर तृतीय पारितोषिक ( गट ब) - वाडा / ठाणे, सीमा महाले - नविन शैक्षणिक धोरणाचे बहुजन समाजावर परिणाम यांना मिळाले असून प्रोत्साहन पारितोषिके संदिप गायकवाड - नागपूर ( गट ब ) वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरची आव्हाने व त्यांचे समाधान , प्रिया भोले - पुणे ( गट अ) लोकशाही आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर, प्रणय प्रभा - नागपूर (गट ब ) विषय-वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरची आव्हाने व समाधान, पुर्वा कुलकर्णी - नाशिक ( गट अ ) विषय-लोकशाही आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर, किर्ती होवळे - सांगली (गट अ) विषय -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेल्या वृत्तपत्रांचा आढावा , अमित कांबळे - कल्याण ( गट ब) विषय- वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरची आव्हाने व त्यांचे समाधान,
स्पर्धेत विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र तसेच ह्या स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धेचा निकाल ऑनलाइन गुगलमीट द्वारे कार्यक्रम घेऊन जाहीर करण्यात आले. यावेळी परीक्षक, कवी साहित्यिक नवनाथ रणखांबे, कवी ॲड. प्रज्ञेश सोनावणे आणि इंजि.गौतम बस्ते यांनी निकाला संदर्भात माहिती देऊन निबंध कसे असावेत, निबंध कसे लिहावे याबद्दल उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद